AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, कंपनीच्या संस्थापकांनी विचारलं तुम्हाला कोणता रंग हवा आहे?

आघाडीची कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या ओलाने (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, कंपनीच्या संस्थापकांनी विचारलं तुम्हाला कोणता रंग हवा आहे?
Ola Electric Scooter
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 25, 2021 | 7:54 PM
Share

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Ola going launch E Scooter, founder asks people to suggest colors for Electric Scooter)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या ओलाने (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. अशातच ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रंगांबाबत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

भाविश अग्रवाल यासंदर्भात ट्विट करुन लोकांना विचारलं आहे की, तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या रंगात हवी आहे. भविश अग्रवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आता काही पेंट ऑर्डर करण्याची वेळ आली आहे! ओला स्कूटरवर आपल्याला कोणता रंग हवा आहे? तुम्हाला काळा रंग हवा असेल, तो आधाची निवडला आहे. तुम्हाला अजून कोणता रंग हवा आहे? दरम्यान, असे म्हटले जात आहे की, जुलैमध्ये कंपनी स्कूटरची किंमत जाहीर करू शकते.

हायपर चार्जर नेटवर्क स्थापित करण्याची तयारी

ओला इलेक्ट्रिकने भारतीय शहरांमध्ये ‘हायपर चार्जर नेटवर्क’ उभारण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. या नेटवर्कमध्ये भारतातील 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंट्सचा समावेश असेल. तर तामिळनाडूजवळील आगामी सुविधेसाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचीही कंपनीने घोषणा केली आहे.

10 हजार लोकांना रोजगार

हा प्लांट वर्षाला 20 लाख युनिट्सवर काम करणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याद्वारे सुमारे 10,000 नोकर्‍या निर्माण होतील. याला जगातील सर्वात मोठी ई-स्कूटर उत्पादन सुविधा म्हणून संबोधले जाईल, असादेखील दावा कंपनीने केला आहे.

याबाबत भाविश म्हणाले की, “आम्ही जूनपर्यंत हा कारखाना सुरू करू, ज्यामध्ये 20 लाख युनिट्स तयार करण्याची क्षमता असेल आणि पुढील 12 महिन्यांत हा कारखाना उभारल्यानंतर आम्ही रॅम्पवर उतरू. त्यानंतरच इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू होईल. कारखान्याचे काम जूनमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.”

इतर बातम्या

Ola कंपनी स्कूटरसह इलेक्ट्रिक कार लाँच करणार, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, अवघ्या काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज

(Ola going launch E Scooter, founder asks people to suggest colors for Electric Scooter)

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा