AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठण करण्यावर बंदी, मुस्लिम देशाने का घेतला निर्णय?

Eid Namaaz : एका मुस्लिम देशाने ईद-उल-फितर संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर ईदची नमाज अदा न करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. यामागील कारण जाणून घेऊयात.

ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठण करण्यावर बंदी, मुस्लिम देशाने का घेतला निर्णय?
NamazImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 19, 2026 | 6:57 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इराणकडून अनेक आखाती देशांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशातच आता इस्लाम धर्मातील पवित्र ईद-उल-फितर हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त मुस्लिम बांधव खुल्या मैदानात नमाज पठण करत असतात. मात्र आता संयुक्त अरब अमिरात (UAE) ने ईद-उल-फितर संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर ईदची नमाज अदा न करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. नमाज फक्त मशिदींमध्येच अदा करावी असी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. यूएईच्या जनरल अथॉरिटी ऑफ इस्लामिक अफेयर्सने ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.

मोकळ्या मैदानात नमाज पठण करण्यावर बंदी

अनेक आखाती देशांमध्ये ईद-उल-फितरची नमाज मोठ्या मोकळ्या मैदानात एकत्रितपणे अदा केली जाते, परंतु यावेळी तसे होणार नाही. युएई प्रशासनाने नागरिकांना मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, यूएईची एअर डिफेन्स सिस्टम सतत मिसाईल आणि ड्रोन हल्ले रोखण्यात गुंतलेली आहे. अनेक ड्रोन हवेतच निकामी केले जातात. मात्र काही ठिकाणी अवशेष पडल्यामुळे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा अवशेषांचा धोका टाळण्यासाठी मशिदींमध्येच नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इराणचे हल्ले वाढले

इराणने रास लफान इंडस्ट्रियल सिटी (कतार) वर हल्ला केला, जो जगातील सर्वात मोठा LNG निर्यात केंद्र मानला जातो. या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय खाडी देशांमधील तेल आणि गॅस प्रकल्पांनाही लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणने यूएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरही क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे समोर आले आहे. जगातील सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाणाऱ्या दुबईतील नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

इस्लामिक देशांची बैठक

दरम्यान, अलिकडेच सौदी अरेबिया ची राजधानी रियाध येथे अरब आणि इस्लामिक देशांची बैठक पार पडली. यात अनेक देशांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला. फैसल बिन फरहान अल साउद यांनी सांगितले की सौदी अरेबियाला आपल्या देशाच्या आणि आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी लष्करी कारवाई करण्याचा अधिकार आहे. संपूर्ण खाडी प्रदेशात परिस्थिती तणावपूर्ण आहे. याच कारणामुळे ईदच्या निमित्तानेही लोकांना सुरक्षित ठिकाणी राहून इबादत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान