AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑगस्ट संपण्यापूर्वी ही 4 कामे पूर्ण करा… अन्यथा करावा लागेल त्रासाचा सामना

Important Financial Tasks : ऑगस्ट महिना संपण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. खालील 4 महत्त्वाची कामे अद्याप केली नसतील तर तु्म्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑगस्ट संपण्यापूर्वी ही 4 कामे पूर्ण करा... अन्यथा करावा लागेल त्रासाचा सामना
4 Work Need to done before 31 augustImage Credit source: Google
| Updated on: Aug 21, 2026 | 5:31 PM
Share

ऑगस्ट महिना संपण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यासह आता काही महत्त्वाच्या कामांच्या अंतिम मुदतीही जवळ आल्या आहेत. तुम्ही यापैकी काम अद्याप केले नसेल, तर जास्त उशीर करू नका. या कामाची अंतिम तारीख निघून गेल्यानंतर दंड भरावा लागू शकतो किंवा विनाकारण अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळवत असाल, व्यवसाय करत असाल किंवा सोशल मीडियातून कमाई करत असाल, तर ही कामे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इन्कम टॅक्स रिटर्न

जर तुमचे उत्पन्न नोकरीऐवजी व्यवसायातून होत असेल आणि तुमच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नसेल, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. यामध्ये युट्यूब, इन्स्टाग्राम, फ्रीलान्स काम किंवा इतर माध्यमातून कमाई करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असेल. उत्पन्नाचा योग्य तपशील देऊन वेळेत रिटर्न भरा. अंतिम तारीख उलटल्यानंतर रिटर्न भरल्यास अतिरिक्त रक्कम भरावी लागू शकते.

उत्पन्नाचा संपूर्ण हिशोब तपासा

तुमचे उत्पन्न केवळ पगारापुरते मर्यादित नसेल, तर तुमच्या सर्व कमाईचा एकदा आढावा घ्या. बँकेकडून मिळालेले व्याज, शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न, घरभाड्यातून मिळणारे पैसे किंवा सोशल मीडियातून झालेली कमाई यांचीही तपासणी करा. अनेकदा एखादे उत्पन्न रिटर्नमध्ये दाखवण्याचे राहून जाते. त्यामुळे रिटर्न भरण्यापूर्वी बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे तपासणे महत्त्वाचे आहे.

क्रेडिट कार्डचे नवीन नियम तपासा

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असल्यास बँकेने ऑगस्टमध्ये कोणतेही नवीन नियम लागू केले आहेत का, हे तपासा. अनेकदा बँका काही व्यवहारांवरील फायदे कमी करतात किंवा विशिष्ट सेवांवर नवीन शुल्क लागू करतात. विशेषतः भाडे, विमा, शिक्षण, सरकारी पेमेंट आणि इतर खर्चांसाठी क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनी कार्डचे नवीन नियम जरूर वाचावेत.

बँक खात्याची माहिती अपडेट करा

तुमच्या बँक खात्यात मोबाइल नंबर, ई-मेल आणि इतर आवश्यक माहिती योग्य आहे का, हे एकदा तपासा. बँकेने कोणतेही कागदपत्र अपडेट करण्यास सांगितले असल्यास तेही वेळेत पूर्ण करा. तसेच खात्यात होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवा. तुम्ही न केलेला कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा.

Follow Us
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी