Gold Purchase : आयात शुल्क वाढवलं, मोदींचं आवाहन, त्यानंतर भारतीयांच्या सोनं खरेदीत किती फरक पडला? रिपोर्ट काय सांगतो?

Gold Purchase : मागच्या अनेक दिवसांपासून सोन्याबद्दल बरीच चर्चा आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोनं खरेदी करु नका वर्षभर असं आवाहन केलं. त्याचं कारण असं आहे की, सोन्यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढतोय. इतक्या सगळ्या आवाहनानंतर सोनं खरेदीत कितपत फरक पडलाय? रिपोर्ट काय सांगतो?

Gold Purchase : आयात शुल्क वाढवलं, मोदींचं आवाहन, त्यानंतर भारतीयांच्या सोनं खरेदीत किती फरक पडला? रिपोर्ट काय सांगतो?
Gold
| Updated on: Jun 02, 2026 | 4:05 PM

जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात सोन्याचं एक वेगळं स्थान आहे. सोन्यासोबत भारतीयांचं एक वेगळं नातं आहे. अडचणीच्या काळात जास्त पैसा मिळवून देणारा धातू हे सोन्याचं महत्व आहेच. पण सोन्याच्या बाबतीत भारतीय खूप भावनिक असतात. 1991 साली जेव्हा देशाचं सोनं गहाण ठेवायची वेळ आलेली, तेव्हा ती गोष्ट भारतीयांच्या मनाला खूप लागलेली. नाईलाजाने सोनं विकावं लागणं ही भावना मनाला खूप लागते. म्हणून आपल्याकडे जितकं जास्त सोनं तितकी श्रीमंती बक्कळ मानली जाते. पण सध्या याच सोन्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो आहे. कारण सोनं खरेदीसाठी डॉलरमध्ये पैसा मोजावा लागतो. त्यात आपली परकीय गंगाजळी आटत चालली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी करु नका असं आवाहन केलं. पण त्याचा काहीही फायदा झालेला नाही. भारतीयाचं सोन्यावर असलेलं प्रेम कोणापासून लपून राहिलेलं नाही. अलीकडेच सरकारने सोनं खरेदी कमी व्हावी म्हणून सोन्यावरील आयात शुल्क दुप्पट केलं. मात्र, तरीही सर्राफा बाजार आणि ज्वेलरी शो...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us