AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती, ह्युंडाईनंतर आता अशोक ले लँडचंही उत्पादन बंद

मारुती आणि ह्युंडाईनंतर आता देशातील प्रमुख व्यावसायिक गाडी निर्माती कंपनी अशोक ले लँड आपले प्रोडक्शन बंद (Ashok ley land shut down production) करत आहे.

मारुती, ह्युंडाईनंतर आता अशोक ले लँडचंही उत्पादन बंद
| Edited By: | Updated on: Oct 05, 2019 | 11:50 AM
Share

मुंबई : मारुती आणि ह्युंडाईनंतर आता देशातील प्रमुख व्यावसायिक गाडी निर्माती कंपनी अशोक ले लँड आपले प्रोडक्शन बंद (Ashok ley land shut down production) करत आहे. पुढील 15 दिवसांसाठी कंपनीकडून प्रोडक्शनची काम बंद ठेवण्यात (Ashok ley land shut down production) येणार आहेत, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

देशातील आर्थिक मंदीमुळे मोठ्या प्रमाणात ऑटो इंडस्ट्रीला याचा फटका बसला आहे. मंदीमुळे गाड्यांच्या खरेदीत घट होत आहे. तसेच जड व्यावसायिक वाहनांच्या खरेदीतही घट होत आहे. त्यामुळेच अशोक ले लँड पुढील 15 दिवसांसाठी प्रोडक्शन बंद ठेवत आहे. काहीदिवसांपूर्वीच मारुती आणि ह्युंडाईने आपले प्रोडक्शन बंद ठेवले होते.

“आम्ही आमचे उत्पादन विक्रीसाठी अनुरुप बनवण्यासाठी, ऑक्टोबर महिन्यात 2 ते 15 दिवसांपर्यंत उत्पादनाचे काम बंद करणार आहे”, असं अशोक ले लँडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सप्टेंबर 2019 मध्ये अशोक ले लँडच्या वाहनांची विक्री 55 टक्क्यांवरुन घटून 8 हजार 780 वर आली आहे. कंपनीने एक वर्षापूर्वी याच महिन्यात 19 हजार 374 वाहनांची विक्री केली होती. देशातील मार्केटमध्ये वाहनांची विक्री एकूण 56.57 टक्क्यांवरुन घटून 7 हजार 851 वाहनांवर आली. जी गेल्यावर्षी याच महिन्यात 18,078 वर होती.

या दरम्यान, कंपनीच्या मध्यम आणि छोट्या व्यावसायिक वाहनांची विक्री 69 टक्क्यांवरुन घटून 4 हजार 35 वर आली. एकवर्षापूर्वी याच महिन्यात हा आकडा 13 हजार 056 होता. तसेच हलक्या वाहनांची देशातील मार्केटमधील विक्री 24 टक्क्यांवरुन घटून 3 हजार 816 वर आली. जी सप्टेंबर 2018 मध्ये 5 हजार 022 होती.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...