AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर बसल्या 10 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये

जेवणाचा विषय आला की प्लेटमध्ये लोणच्याशिवाय अन्न अपूर्ण वाटतं. याचाच व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

घर बसल्या 10 हजारात सुरू करा 'हा' बिझनेस, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये
| Edited By: | Updated on: Mar 19, 2021 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली : सध्याच्या महागाईत आणि कोरोनाच्या भीषण काळात पैशांचं गणित आखणं फारच महत्त्वाचं आहे. अशात आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही घर बसल्या उत्तम पैसे कमवू शकता. खरंतर, जेवणाचा विषय आला की प्लेटमध्ये लोणच्याशिवाय अन्न अपूर्ण वाटतं. याचाच व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. (business idea start pickle business with only 10 thousand rupee and earn 25 to 30 thousand a month)

जर आपण नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर लोणच्याचा बिझिनेस (Pickle Business) हा एक चांगला मिळकत करणारा व्यवसाय आहे. पिकल मेकिंग बिझिनेस (Business Idea) घरातूनच सुरू करता येईल. हा व्यवसाय कसा सुरू करू आणि आपली कमाई किती असेल हे जाणून घेऊयात…

10 हजार रुपयांमध्ये सुरू करा व्यवसाय…

आपण घरी लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय फक्त 10 हजार रुपयांपासून सुरू होतो. यातून तुम्ही 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. ही मिळकत आपल्या उत्पादनाची मागणी, पॅकिंग आणि क्षेत्रावर देखील अवलंबून असते. तुम्ही लोणच्याची ऑनलाईन, घाऊक, किरकोळ बाजारात आणि किरकोळ साखळ्यांना विकू शकता.

900 चौरस फुट क्षेत्र आवश्यक आहे

लोणचं बनवण्याच्या व्यवसायासाठी 900 चौरस फूट क्षेत्र असणे आवश्यक आहे. लोणचं तयार करण्यासाठी, ते सुकवणं पॅक करणं यासाठी मोकळ्या जागेची आवश्यकता आहे.

लोणचे बनवण्याच्या व्यवसायात खूप पैसे कमवाल…

10 हजार रुपये खर्च लावून पिकल मेकिंग व्यवसाय दुप्पट केला जाऊ शकतो. पहिल्या मार्केटिंगमध्ये खर्चाची संपूर्ण रक्कम परत मिळवली जाते आणि त्यानंतर फक्त नफा होतो. हा छोटासा व्यवसाय कठोर परिश्रम आणि नवीन नवकल्पनांच्या माध्यमातून मोठा व्यवसाय बनवला जाऊ शकतो. या व्यवसायाचा नफा दरमहा प्राप्त होईल आणि नफ्यातही वाढ होईल.

पिकल मेकिंग बिझिनेसचे लायसन्स कसे मिळवायचे?

लोणचं बनवण्याच्या व्यवसायासाठी परवाना आवश्यक असतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) कडून परवाना मिळवला जाऊ शकतो. या परवान्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज करता येतो. (business idea start pickle business with only 10 thousand rupee and earn 25 to 30 thousand a month)

संबंधित बातम्या – 

1 वर्षात FD वर मिळणार 6 टक्के जास्त फायदा, 31 मार्चपर्यंत पैसा होईल डबल

SBI ची खास सुविधा! विना कागदपत्रं एक मिनिटांत उघडा खातं, वाचा संपूर्ण प्रोसेस

घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वेळेची मर्यादा नाही आणि कामाचा लोडही नाही!

Start Business in India : कमी बजेटमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी खास 5 आयडिया

(business idea start pickle business with only 10 thousand rupee and earn 25 to 30 thousand a month)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.