AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata 1MG franchise : केवळ 10 हजारात टाटा ग्रुपचे पार्टनर व्हा, महिन्याला मोठी कमाई

आरोग्य किंवा फार्मसीसंबंधी उद्योगांना किती महत्त्व आहे हे कोरोनाकाळात प्रकर्षाने जाणवलं. फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

Tata 1MG franchise : केवळ 10 हजारात टाटा ग्रुपचे पार्टनर व्हा, महिन्याला मोठी कमाई
Ratan Tata
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 2:24 PM
Share

Tata 1MG franchise : आरोग्य किंवा फार्मसीसंबंधी उद्योगांना किती महत्त्व आहे हे कोरोनाकाळात प्रकर्षाने जाणवलं. फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. ऑनलाईन फार्मसी 1MG सध्या वेगाने वाटचाल करत आहे. घरपोच औषधे पोहोचवण्याचं काम ही वेबसाईट करते. ई फार्मसी 1MG मध्ये बहुतेक शेअर्स हे सध्या टाटा डिजीटलकडे आहेत.

1MG सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करत आहे. या कंपनीच्या फ्रँचायजीसाठी रांगा लागत आहेत. अनेकजण या 1MG च्या फ्रँचायजीमधून चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात बिझनेसचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. टाटा ग्रुपने यासाठी एक प्रोग्राम लाँच केला आहे. ‘Sehat ke Sathi’ असं या प्रोग्रामचं नाव आहे. यानुसार तुम्हाला एक एरिया दिला जाईल, तिथे तुम्हाला नवे ग्राहक शोधावे लागतील. तुम्ही जेवढे ग्राहक जोडाल, तेवढं तुम्हाला कमिशन मिळेल.

फार्मसी डीग्री आवश्यक

मेडिकल सुरु करण्यासाठी फार्मसी डीग्री आवश्यक असतेच. मात्र यामधील गुंतवणूकही बऱ्यापैकी जास्त असते. औषध दुकान सुरु करण्यासाठी परवाना मिळवणं तसं कठीण काम आहे. अशावेळी 1MG च्या ‘सेहत के साथी’ या प्रोग्राम अंतर्गत मेडिकल मालकांसह अन्य पात्र व्यक्तीही लाभ घेऊ शकतात. साखळीनुसार चालणारा हा व्यवसाय आहे. जेवढे ग्राहक जास्त तेव्हढं कमिशन जास्त.

केवळ 10 हजारांची गुंतवणूक

जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हालाही या प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचं असेल तर केवळ दहा हजाराच्या गुंतवणुकीत तुम्ही ते होऊ शकता. तुम्हाला ब्लड प्रेशर चेक करण्याची मशीन, शुगर चेक करण्याचं मशीन आणि 500 व्हिजिटिंग कार्ड मिळतील. सध्या 1 एमजीच्या या प्रोग्राममध्ये 100 पेक्षा जास्त जण जोडले गेले आहेत.

ई फार्मसी व्यवसायाची वेगाने वाटचाल

सध्ये ई फार्मसी व्यवसाया वेगाने वाढत आहे. भविष्यात ऑनलाईन फार्मसीची मागणी आणखी वाढू शकते. काही रिपोर्टनुसार, भारतात ई फार्मसी बिझनेस 2023 पर्यंत 2.7 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 17 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. सध्या या उद्योगाची उलाढाल 2500 कोटींपर्यंत आहे.

1MG चा इतिहास

1MG ची स्थापना प्रशांत टंडन आणि गौरव अग्रवाल यांनी 2015 मध्ये केली. या वेबसाईटवरील माहितीनुसार, इथे ऑनलाईन डॉक्टर, ऑनलाईन औषधे, लॅब टेस्ट, ब्लड टेस्ट अशा मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत. इथे आयुर्वेदिक औषधेही मिळतात. शिवाय सध्या कोरोना चाचण्या, सल्ला अशा सुविधाही आहेत. 1MG सध्या देशात 1800 पेक्षा जास्त लहान-मोठ्या शहरात औषधांची घरपोच डिलिव्हरी करते.

(टीप : कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.