तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?

यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या एक 10 रुपयांची नोट असणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर 25 हजार तुमचे.

तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात जर तुम्हालाही पैसे कमावायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. घरी बसल्या तुम्हाला 25 हजार कमवण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या एक 10 रुपयांची नोट असणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर 25 हजार तुमचे. जाणून घेऊयात काय आहे 10 रुपयांच्या नोटेवर 25 हजार कमावण्याचा फंडा…

एका नोटेमुळे कमावाल पैसे हल्ली बाजारात नव्या नोटा प्रत्येकाला पाहायला मिळतात, पण जुन्या नोटा बाजारातून गायब झाल्या आहेत. अशात जर तुमच्याकडे जुनी 10 रुपयांची नोट असेल तर याची मोठी किंमत तुम्हाला मिळेल. ज्या 10 रुपयांच्या नोटेविषयी आम्ही बोलत आहोत ती भारतात अनेक वर्ष चालली.

कोणती आहे 10 ची नोट? ब्रिटीश भारतात या नोटा चालायच्या, ज्या कोणाला कदाचित माहितही नसेल. पहिल्या दहा रुपयांच्या नोटांवर अशोक स्तंभ असायचा. 3-तोंड असलेल्या सिंहाची ही जुनी नोट आता दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे जुन्या वस्तूंचा संग्रह करणारे या नोटीला कीतीही पैशांत खरेदी करण्यासाठी तयार आहेत.

किती पैसे मिळणार ? दहा रुपयांच्या एका नोटीचे तुम्हाला तब्बल 20-25 हजार रुपये मिळू शकतात. या नोटेची तुम्ही ऑनलाईन विक्री करू शकता.

कुठे आणि कशी विकणार नोट? इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर घरी बसल्या जुन्या नोटांची चागंली किंमत मिळत आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची नोट विकू शकता. या बदल्यात तुम्हाला 25 हजार मिळतील.

1943 मध्ये ही नोट ब्रिटीश राजांनी जारी केली होती. यावर भारतीय सी डी देशमुख यांनी सही केली आहे. दहा रुपयांच्या या जुन्या नोटात एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसर्‍या बाजूला एक नाव लिहिलं आहे. या नोटांच्या दोन्ही बाजूंनी इंग्रजीत 10 रुपये असं लिहिण्यात आलं आहे.

Published On - 3:18 pm, Sun, 18 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI