Intrest Rate : निवृत्तीत ‘आधार’ काठी; 8 वर्षात रक्कम दामदुप्पट, पीपीएफपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या पर्याय

| Updated on: Dec 23, 2021 | 7:32 PM

पीपीएफ(PPF) ऐवजी स्वेच्छिक भविष्यनिर्वाह निधी (व्हीपीएफ-VPF) तुमच्यासाठी स्वावलंबनाचा ‘अर्थमार्ग’ ठरू शकतो. पीपीएफपेक्षा अधिक व्याज व्हीपीएफवर मिळू शकते. तुम्हाला नव्याने खाते उघडण्याची आवश्यकता नाही. यावर मिळणारं व्याज सेक्शन 80सी अंतर्गत करमुक्त आहे.

Intrest Rate : निवृत्तीत ‘आधार’ काठी; 8 वर्षात रक्कम दामदुप्पट, पीपीएफपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या पर्याय
गुंतवणुकीचे पर्याय, प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही नोकरदार आहात? निवृत्तीनंतर इतरांच्या आधाराविना स्वावलंबीपणे जीवन जगू इच्छिता? तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतर आर्थिक सक्षमतेसाठी भविष्य निर्वाह निधीचा (पीपीएफ-PPF) पर्याय अनेकजण स्वीकारतात. परंतु, पीपीएफ ऐवजी स्वेच्छिक भविष्यनिर्वाह निधी (व्हीपीएफ) तुमच्यासाठी स्वावलंबनाचा ‘अर्थमार्ग’ ठरू शकतो. पीपीएफपेक्षा अधिक व्याज व्हीपीएफवर मिळू शकतं. तुम्हाला नव्याने खाते उघडण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे व्हीपीएफ खात्यावर मिळणारे व्याज सेक्शन 80सी अंतर्गत करमुक्त आहे. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ-PPF) हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ-EPFO) उपक्रम आहे. याद्वारे कर्मचारी आपल्या वेतनातील काही हिस्सा याप्रकारच्या निधीमध्ये जमा करू शकतात. व्हीपीएफमध्ये कर्मचारी आपल्या मूळ वेतनाच्या 100 टक्के योगदान देऊ शकतात.

व्हीपीएफ अप, पीपीएफ डाउन :

आजमितीला पीपीएफच्या तुलनेत व्हीपीएफवर अधिक व्याज मिळतो. पीपीएफवर 7.1 टक्के तर व्हीपीएफ वर 8.50 टक्के व्याज मिळतं. तुम्ही यामध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार बदल करू शकतात आणि तुमच्या निर्णयाप्रमाणे बंदही करू शकतात. पीपीएफमध्ये एका वर्षात अधिकतम 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा आहे. व्हीपीएफमध्ये गुंतवणुकीची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.

व्हीपीएफचे लाभ :
– व्हीपीएफवर ईपीएफ प्रमाणेच व्याज मिळतं.
– नोकरी बदलल्यानंतर व्हीपीएफ फंड ट्रान्सफर करू शकतात.
– व्हीपीएफ आयकर अधिनियम कलम 80सी अनुसार कर कपातीसाठी पात्र आहे.
– व्हीपीएफमध्ये रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करता येतो.
– व्हीपीएफमधून आंशिक स्वरुपात पैसे काढण्यासाठी खातेधारकाला नोकरीत पाच वर्षे पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यापूर्वी रक्कम काढल्यास कर आकारणी केली जाते.
– व्हीपीएफची संपूर्ण रक्कम केवळ निवृत्तीनंतर मिळू शकते.

पीपीएफ 10 वर्षात दामदुप्पट :

गुंतवणूक विश्वात ‘रूल ऑफ 72’ विशेष नियम आहे. तुमच्या गुंतवणुकीचा दामदुप्पट कालावधी यामुळे तुम्हाला कळू शकेल. 72 संख्येला व्याजदराने भागल्यास मिळणारं उत्तर दामदुप्पट कालावधी दर्शवितो.

पीपीएफ : नियम 72

• गृहीत व्याजदर- 7.1टक्के/प्रति वर्ष
• दामदुप्पट कालावधी- 72/7.1= 10.14 वर्षे

तुमचे पैसै पीपीएफमध्ये 10.14 वर्षात दामदुप्पट होतील.

व्हीपीएफ 8 वर्षात दामदुप्पट :

व्हीपीएफ – नियम 72
• गृहीत व्याजदर- 8.50टक्के/प्रति वर्ष
• दामदुप्पट कालावधी- 72/8.50= 8.47

तुमचे पैसे व्हीपीएफमध्ये 8.47 वर्षात दामदुप्पट होतील. पीपीएफच्या तुलनेत व्हीपीएफमध्ये 1.67 वर्षापूर्वीच पैसे दामदुप्पट होतात.

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sensex : ‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं; शेअर बाजारात तेजी, 385 अंकांनी वधारला सेन्सेक्स

Air Purifier : फिलिप्सनं सादर केला 3 इन 1 प्युरिफायर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये