Sensex : ‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं; शेअर बाजारात तेजी, 385 अंकांनी वधारला सेन्सेक्स

आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक व्यवहारांचे पडसाद भारतीय शेअर मार्केट(Stock market)वर दिसून आले. अमेरिकेने अर्थव्यवस्थेसंबंधित आकडेवारी घोषित केली. यावर ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. गुंतवणूकदारांच्या आशा उंचावल्याचा हा परिणाम होता

Sensex : ‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं; शेअर बाजारात तेजी, 385 अंकांनी वधारला सेन्सेक्स
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 6:39 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारा(Stock market)त सलग तिसऱ्या दिवशी तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहारांच्या तेजीचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले. सेंन्सेक्स(Sensex)नं 57 हजार आणि निफ्टी(Nifty)नं 17 हजारांचा टप्पा पार केला. आज (गुरुवारी) बाजार सेंन्सेक्समध्ये 385 अंकांच्या वाढीसह 57,315वर जाऊन पोहोचला. निफ्टीत 117 अंकाची नोंदवित 17071वर बंद झाला.

शेअर बाजारात तेजीची कारणं – आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक व्यवहारांचे पडसाद भारतीय शेअर मार्केट(Stock market)वर दिसून आले. अमेरिकेने अर्थव्यवस्थेसंबंधित आकडेवारी घोषित केली. या आकडेवारीवर ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. गुंतवणूकदारांच्या आशा उंचावल्यानं ओमिक्रॉनच्या सावटाखाली असलेल्या शेअर मार्केटनं उसळी घेतली. अमेरिकन सरकारच्या सूत्रांनुसार, तिसऱ्या तिमाहीत 2.3 टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणाचे संकेत मिळाले आहेत.

मार्केटचं रिपोर्ट कार्ड : – आज (गुरुवारी) स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये तेजीचे वातावरण पाहायला मिळालं. – ब्रॉड मार्केटमध्ये स्मॉलकॅप-50 इंडेक्स आज 1.63 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. – स्मॉलकॅप-100 इंडेक्स 1.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद – ब्रॉड मार्केटमध्ये निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये एक टक्क्यांहून अधिक तेजी – आजच्या दिवसात सेक्टर इंडेक्समध्ये रिअल्टी सेक्टरची आगेकूच – सरकारी बँकांच्या इंडेक्समध्ये 1.42 टक्क्यांची आणि एफएमसीजी सेक्टर इंडेक्समध्ये 1.31 टक्क्यांची वाढ – मीडिया आणि मेटल सेक्टर रेड झोनमध्ये बंद

कुठे अप-कुठे डाउन? निफ्टीत समाविष्ट 35 स्टॉक वाढीसह बंद झाले. सर्वाधिक वाढ नोंदविले गेलेले शेअर्स : • पॉवरग्रिड (3.67 टक्के) • आयओसी (3.03 टक्के) • ओएनजीसी (2.7 टक्के)

डीव्हिज लॅबमध्ये 1.76 टक्के आणि जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये 1.66 टक्क्यांनी घसरण नोंदविली गेली. निफ्टी स्मॉल कॅपमध्ये समाविष्ट एमएमटीसी 9.81 टक्के, एफएसएल 9.46 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

SmartPhone : टेक्नो कॅमन 18नं लॉन्च केला नवा स्मार्टफोन, 48MP सेल्फी कॅमेऱ्यासह आहेत जबरदस्त फिचर्स

Air Purifier : फिलिप्सनं सादर केला 3 इन 1 प्युरिफायर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Hyundai Venue : ह्युंदाईनं मागच्या 31 महिन्यात विकल्या 2.5 लाख वेन्यू! काय आहेत कारची वैशिष्ट्ये?

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.