Air Purifier : फिलिप्सनं सादर केला 3 इन 1 प्युरिफायर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

फिलिप्स डोमेस्टिक अप्लायन्सेस इंडिया(Philips domestic Appliances India)नं भारतात एक मल्टीफंक्शनल एअर प्युरिफायर (Air Purifier) सादर केलंय. तीन-स्तर HEPA फिल्टरेशन सिस्टमसह हे उपलब्ध आहे.

Air Purifier : फिलिप्सनं सादर केला 3 इन 1 प्युरिफायर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
फिलिप्स एअर प्युरिफायर
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 4:40 PM

मुंबई : फिलिप्स डोमेस्टिक अप्लायन्सेस इंडिया(Philips domestic Appliances India)नं भारतात एक मल्टीफंक्शनल एअर प्युरिफायर (Air Purifier) सादर केलंय. तीन-स्तर HEPA फिल्टरेशन सिस्टमसह हे उपलब्ध आहे. हे प्युरिफायर हवेतले 99.95 टक्के कण काढून टाकू शकतं, असा कंपनीचा दावा आहे. Philips 2000 Series 3-in-1 प्युरिफायर, फॅन आणि हीटर यासारख्या अंतर्गत वैशिष्ट्यांसह येतं. फिलिप्सच्या काही मल्टीफंक्शनल गॅझेट्सपैकी हे एक आहे. नवीन प्युरिफायर फॅन ब्लोअर आणि प्युरिफायिंग हीटर मोडवरदेखील काम करतो. Philips 3-in-1 Air Purifierची भारतात किंमत 32,995 रुपये आहे. फिलिप्सच्या अधिकृत वेबसाइटवरून एअर प्युरिफायर खरेदी केला जाऊ शकतो.

इतर प्युरिफायरना टक्कर डायसन एअर प्युरिफायर(Dyson Air Purifier)देखील भारतात याच वैशिष्ट्यांसह विकला जातो. हे एका स्मार्ट गॅझेटप्रमाणं काम करतो. यात प्युरिफायर तसंच हिटींगची सुविधादेखील आहे. गॅजेट्स बनवणाऱ्या ब्रिटिश कंपनीचा हा डायसन एअर प्युरिफायर त्याच्या खास वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहे. पण, डायसनच्या या प्युरिफायर हॉट+ कूल कॉम्बो गॅझेटची किंमत 66, 900 रुपये आहे. त्यामुळे, जर तुम्हाला वैशिष्ट्यांसह फिलिप्स 3-In-1 एअर प्युरिफायर खरेदी करायचा असेल, तर डायसनच्या जवळपास निम्म्या किंमतीत तुम्हाला हा उपलब्ध आहे. फिलिप्सचा हा नवीन प्युरिफायर सध्या बाजारात असलेल्या प्युरिफायरना टक्कर देईल.

फिलिप्स 2000 मालिका 3-In-1चे फिचर्स 59 सेमी उंचीसह उपलब्ध आहे. तो 3D की होलसारखा दिसतो. काळ्या प्लास्टिकपासून तो बनलेला आहे. यात रंगीत एलईडी पॅनेल आहे. यामुळे तापमान, हवेची गुणवत्ता, PM2.5 संख्या दर्शवतं. फिलिप्स 3-In-1 प्युरिफायर 42 चौ.मी.पर्यंतच्या खोल्यांसाठी डिझाइन केलाय. विशेष म्हणजे तो लाइटवेट आहे आणि दिवसभर वापरला जाऊ शकतो.

थ्री-स्पीड सेटिंग्जसह उपलब्ध 7.5W, 15W, आणि 25W किंवा थ्री-स्पीड हीट लेव्हल : 1250W, 1500W आणि 2200W, लाइट कंट्रोल आणि डिस्प्लेसाठी 3-लेव्हल्स सेटिंग्जसह तो उपलब्ध आहे. त्याचा आकार आणि कार्यक्षममुळे तो तुमच्या घरातील हवा स्वच्छ करू शकतो. त्यामुळेच तो एक चांगला ऑप्शन झालाय. यात हिटींगचंही फंक्शन आहे. आपण आपल्या घराचं प्रदूषण, विषाणू आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करू शकता आणि त्याच वेळी खोली लवकर गरमदेखील करू शकता.

Online Payments : ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतीत 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचा बदल, जाणून घ्या…

Hyundai Venue : ह्युंदाईनं मागच्या 31 महिन्यात विकल्या 2.5 लाख वेन्यू! काय आहेत कारची वैशिष्ट्ये?

Pimpri Murder | अकरावीतील विद्यार्थ्याच्या हत्येचं गूढ उकललं, WhatsApp स्टेटसमधून खुन्नस दिल्याने चुलतभावाकडून खून

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.