Online Payments : ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतीत 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचा बदल, जाणून घ्या…

मागच्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)नं मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यानुसार व्यापार्‍यांना त्यांच्या स्तरावर ग्राहकांचे कार्ड डिटेल्स जतन करण्यापासून प्रतिबंधित केलं. 1 जानेवारी 2022पासून, ग्राहक Amazon, Flipkart, Swiggy, Zomato आदींवर कार्ड डिटेल्स (Card Details) करू शकणार नाहीत.

Online Payments : ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतीत 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचा बदल, जाणून घ्या...
ऑनलाइन पेमेंट प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 3:08 PM

मुंबई : मागच्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)नं मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यानुसार व्यापार्‍यांना त्यांच्या स्तरावर ग्राहकांचे कार्ड डिटेल्स जतन करण्यापासून प्रतिबंधित केलं. हे नियम 1 जानेवारी 2022पासून लागू होतील. ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) सुरक्षित करण्यासाठी हे नियम करण्यात आलेत. सप्टेंबरमध्ये आरबीआयनं कोणत्याही ई-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती.

प्रत्येक व्यवहारात कार्ड डिटेल्स टाकण्याचा त्रास टळला नवीन नियमांनुसार, ग्राहकांना प्रत्येक वेळी कोणत्याही वेबसाइटवरून चेकआउट करताना त्यांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स टाकावे लागतील, कारण ते डिटेल्स या प्लॅटफॉर्मवर सेव्ह केले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यवहारात कार्ड डिटेल्स टाकण्याचा त्रास टाळण्याचा मार्ग टोकनद्वारे सोडवला जाईल.

सोयीस्करपणे करता येईल पेमेंट टोकनायझेशन हा तुमच्या कार्ड तपशीलांसाठी एक यूनिक एल्गोरिथम-जनरेटेड कोड किंवा टोकन आहे. टोकनमुळे ग्राहकांना कार्ड डिटेल्स न उघडता या प्लॅटफॉर्मवर सोयीस्करपणे पेमेंट करता येईल. हे मोठे बदल 1 जानेवारी 2022पासून ऑनलाइन व्यवहारांमध्ये होणार आहेत.

जाणून घ्या स्टेप्स 1 जानेवारी 2022पासून, ग्राहक Amazon, Flipkart, Swiggy, Zomato किंवा इतर कोणताही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार्ड डिटेल्स सेव्ह करू शकणार नाहीत. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी प्रत्येक वेळी ऑर्डर देताना ग्राहकांना त्यांचे कार्ड डिटेल्स टाकणे आवश्यक आहे. 2 प्रत्येक ऑर्डरमध्ये कार्ड डिटेल्स टाकण्याचा त्रास टाळण्यासाठी, ग्राहक त्यांचे कार्ड टोकन करू शकतात. या सुविधेचा वापर करण्यासाठी, तुम्हाला तुमचे कार्ड टोकनाइज करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला संमती द्यावी लागेल. एकदा तुम्ही मान्यता दिल्यानंतर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार्ड नेटवर्कला अतिरिक्त घटक प्रमाणीकरणासह तपशील एनक्रिप्ट करण्यास सांगेल. 3 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला एनक्रिप्टेड तपशील प्राप्त झाल्यानंतर, ग्राहक त्यांच्या आगामी ऑनलाइन व्यवहारांसाठी ते कार्ड संग्रहित करू शकतील. 4 हे लक्षात घ्यावं, की सध्या फक्त मास्टरकार्ड आणि व्हिसा कार्डांना टोकन दिलं जाऊ शकतं. 5 आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे क्रेडिट आणि डेबिट कार्ड दोन्हीसाठी लागू असावीत. 6 नवीन नियम केवळ देशांतर्गत व्यवहारांसाठी आहेत, आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी नाहीत. 7 कार्डच्या टोकनायझेशनसाठी ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. 8 टोकन जनरेट झाल्यावर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म टोकन कार्डचे शेवटचे चार अंक, बँकेचं नाव आणि कार्ड नेटवर्कचं नाव प्रदर्शित करेल. यामुळे ग्राहकांना ते सहज ओळखता येतील.

अनिवार्य नाही एक महत्त्वाचं म्हणजे कार्डचं टोकनायझेशन अनिवार्य नाही आणि ग्राहक प्रत्येक वेळी ऑनलाइन व्यवहार करताना कार्ड डिटेल्स प्रविष्ट करू शकतो.

Bike Theft | बायकोच्या हौसेसाठी महागड्या बाईक्सची चोरी, कल्याणचा चोरटा जेरबंद

शारीरिक संबंधानंतर तरुणाकडून ब्लॉक, चिडलेल्या युवतीचं टोकाचं पाऊल

Gold price | 24 कॅरेट सोने 48500 वर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव!

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.