AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold price | 24 कॅरेट सोने 48500 वर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव!

नाशिकमध्ये आज गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48500 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 राहिले.

Gold price | 24 कॅरेट सोने 48500 वर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Dec 23, 2021 | 2:03 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये आज गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48500 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 राहिले. चांदीचे किलोमागे दर किलोमागे 65000 नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्येही 24 कॅरेट सोन्याचे दर थोड्याफार प्रमाणात याच फरकात नोंदवले गेले.

दिल्लीत महाग

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर गुरुवारी10 ग्रॅममागे 49250 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 47,290 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅमचा दर आज सकाळी 4,699 रुपये नोंदवला गेला. कोलकातामध्ये 47,390 रुपये, चेन्नईमध्ये 45,630 रुपये आणि बेंगळुरूमध्ये 45,140 रुपये नोंदवले गेले. आज 23 डिसेंबर रोजी सर्व प्रमुख शहरांमध्ये विशेषतः दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू – चेन्नई आणि हैदराबाद वगळता चांदीचे दर हे किलोमागे 62,300 रुपये नोंदवले गेले.

मुंबईत स्वस्त

मुंबईमध्ये गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48300 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर गुरुवारी अनुक्रमे 47,300 रुपये नोंदवले गेले. पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 49080 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46500 रुपये नोंदवले गेले. नाशिकमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48500 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 राहिले. चांदीचे किलोमागे दर 65000 नोंदवला गेला. औरंगाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47900 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46990 रुपये नोंदवले गेले.

चांदी महागणार

राज्यांनी लादलेले कर, उत्पादन शुल्क आणि विविध मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांचे दर देशभरात वेगवेगळे असतात. प्रवास, भाडे आणि इतर खर्चावरून भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमतीतील बदलानुसार निश्चित केली जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य याचाही या किमतीवर परिणाम होतो. येणाऱ्या काळात रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर किमती स्थिर राहिल्या, तर चांदी आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये आज गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48500 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 राहिले. चांदीचे किलोमागे दर 65000 नोंदवला गेला. या आठवड्यात साधरणतः 300 ते 400 रुपयांनी सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली. येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती महाग होऊ शकतात, असा अंदाज आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

भेटीत तृष्टता मोठी…कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!

TDR scam | नाशिक महापालिकेतला 100 कोटींचा टीडीआर घोटाळा विधिमंडळात गाजला; महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार