AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Mayor: चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगिता खांडेकर महापौर, काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, उद्धव सेनेने केला खेला?

Udhav Thackeray Shivsena-BJP Alliance: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा गेम होणार अशी परिस्थिती याच पक्षानं आणली. काँग्रेसच्या दुहीचा मोठा फायदा भाजपला झाला. काँग्रेसवर अधिकच्या जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसण्याची नामुष्की ओढावली आहे.

Chandrapur Mayor: चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगिता खांडेकर महापौर, काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, उद्धव सेनेने केला खेला?
काँग्रेसला मोठा झटकाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 10, 2026 | 12:49 PM
Share

Udhav Thackeray Shivsena-BJP Alliance: चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या संगिता खांडेकर अवघ्या एका मताने महापौर झाल्या. भाजप सत्ता स्थापण करणार आणि काँग्रेसचा गेम होणार हे अगोदरपासूनच मानलं जात होतं. चंद्रपूर महागनरपालिकेत सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की आली आहे. पक्षातील दुहीचा अपेक्षेप्रमाणे भाजपला फायदा झाला आहे. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद पार दिल्लीपर्यंत पोहचला होता. त्याचा फायदा भाजपने उचलला. तर ऐनेवेळी उद्धव सेनेने काँग्रेसला हात दिल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे बहुमताचं गणित जुळवण्यात काँग्रेसला यश आले नाही. वंचित आणि MIM च्या नगरसेवकांच्या भूमिकेने चंद्रपूरात पारडेच पालटलं.

संगिता खांडेकर एका मताने विजयी

भाजपच्या संगिता खांडेकर या महापौरपदी निवडल्या गेल्या. त्यांना 32 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला. महाडोळे यांना 31 मते मिळाली. यावेळी वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. तर MIM नगरसेवक तटस्थ राहिला. चुरशीच्या निवडणुकीत भाजपने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली.

चंद्रपूरमध्ये उद्धव सेनेचा मोठा खेला; भाजप-ठाकरे सेनेची युती

आज चंद्रपूरमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे विजय वडेट्टीवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पण त्यांच्यातील बोलणी फिस्कटली. आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर कसा होतो, हे मी पण बघतो, अशी थेट धमकी देत ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी वडेट्टीवारांच्या घरून काढता पाय घेतला. काँग्रेसोबतची बोलणी फिस्कटल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते. त्यामुळे ठाकरे सेना भाजप बरोबर जाण्याचे संकेत मिळाले.

भाजपने आपल्या उमेदवार संगीता खांडेकर यांच्यासाठी अधिकृत व्हीप जारी केला. भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शब्दानुसार भाजपने व्हीप जारी केला असून, याआधी उद्धवसेनेसमोर सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदाचा प्रस्ताव समोर करण्यात आला. त्यानंतर उद्धव सेनेने भाजपसोबत इथं युती केली. महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा दिला. त्यात काँग्रेसचा मोठा खेला झाला.

जनविकास सेनेच्या पदरात काय?

चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 सदस्य आहेत. महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या सेनेप्रमाणेच जनविकास सेनेची भूमिका सुद्धा महत्त्वाची होती. काँग्रेसमधील दुहीचा मोठा फायदा भाजपला झाला. या दोन्ही सेना भाजपने आपल्या गोटात घेतल्या. तर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी या समीकरणात जुळवून घेतले. त्यामुळे ऐनेवेळी वंचितचे दोन नगरसेवक आणि एमआयएमच्या सदस्याची भूमिका मोलाची ठरली. अवघ्या एका मताने भाजपने चंद्रपूरमधील महापौर पद मिळवलं. पण जनविकास सेनेच्या पदरात काय पडलं हा चर्चेचा विषय आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?