AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई काय करतो? जाणून घ्या सर्वकाही

शरद पवार यांची नात रेवती सुळे हिचं लग्न ठरलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीची लवकरच लग्न होणार आहे. रेवती सुळे हिचं लग्न सारंग लखानी यांच्यासोबत होणार आहे... तर जाणून घ्या सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई कोण आहे आणि काय करतो...

सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई काय करतो? जाणून घ्या सर्वकाही
Supriya Sule
| Updated on: Feb 10, 2026 | 12:53 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे हिचं लग्न ठरल्याची माहिती समोर येत आहे. रेवती हिचं लग्न सारंग अरुण लखानी यांच्यासोबत ठरलं आहे. सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, सारंग लखानी एक प्रसिद्ध उद्योजक आणि बॅटमिंटन खेळाडू देखील आहे… सारंग हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे पूत्र आहेत. या प्रकरणाची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली आहे.

सुशील कुमार शिंदे यांची पोस्ट समोर येताच, राजकारण आणि सर्वत्र सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण लग्नाचं ठिकाणी, तारीख आणि कार्यक्रमासंबंधी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. तर जाणून घ्या कोण आहे. सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई सारंग लखानी…

कोण आहे सारंग लखानी?

सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई आणि रेवती सुळे हिचा होणारा पती सारंग मुंबई येथील राहणारा आहे. सारंग यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, सारंग हे गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी मॉडर्न हायड्रोजनमध्ये व्यवसाय विकास सल्लागार (बीडीसी) म्हणून काम केलं आहे.

सारंग हे एक बॅडमिंटन प्लेयर देखील राहिले आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यांच्या BWF प्रोफाइलमध्ये त्यांची जन्मतारीख 23 जुलै 1992 अशी नोंदवली आहे.

विश्वराज ग्रुपचा व्यवसाय काय?

विश्वराज ग्रुपने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सांगितल्यानुसार, भारतातील जल उपयोगिता आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचा एक आघाडीचा विकासक, ज्याचा विशेष भर औद्योगिक वापरासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पाण्याच्या पुनर्वापरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वराज ग्रुप हा एक ESG-केंद्रित जल यूटिलिटी आणि सामाजिक उपक्रम आहे जो पाण्याची शाश्वतता, सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी वचनबद्ध आहे.

लंडन येथे झालं आहे रेवती सुळे हिचं शिक्षण?

सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. 2024 च्या निवडणुकीत तिने बारामतीमध्ये तिच्या आईच्या प्रचारात भाग घेतला. रेवती हिने चुलत भाऊ आणि श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांच्यासोबत बारामती शहराच्या वेगवेगळ्या भागात रोड शोमध्ये भाग घेतला आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?