AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिव्या भारतीच्या निधनाच्या अनेक वर्षांनंतर मोठं रहस्य उघड… कोणी केला धक्कादायक खुलासा?

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिच्या निधनाबद्दल मोठं रहस्य उघड झालं आहे. अभिनेत्रीला वाटायचं तिचा वापर होत आहे... कोणी केला अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा...

दिव्या भारतीच्या निधनाच्या अनेक वर्षांनंतर मोठं रहस्य उघड... कोणी केला धक्कादायक खुलासा?
अभिनेत्री दिव्या भारती
| Updated on: Feb 10, 2026 | 11:06 AM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार लवकर जगाचा निरोप घेतला. काहींनी स्वतःला संपवलं. अशाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती हिने स्वतःला संपवलं. पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला. दिव्या हिच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसलेला. दिव्या हिच्या निधनानंतर अनेकांनी तिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. आता देखील अभिनेता राजू श्रेष्ठ यांना दिव्या हिच्या मृत्यूवर मोठं वक्तव्य केलं आहे. दिव्या हिच्या निधनानंतर आजही तिच्या निधनाबद्दल चर्चा सुरु असतात.

राजू श्रेष्ठ नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाला. ‘दिव्या भारतीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी मला सांगितलेल्या होत्या. शिवाय अनेक उदाहरणं देखील दिली होती. ती एकटी प्रचंड दुःखी होती… पण सध्याच्या काळात नाव घेऊन मला वाद निर्माण करायचे नाहीत. ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड आनंदी होती. पण खासगी आयुष्यात तिच्या आनंद नव्हता…’

पुढे राजू म्हणाला, ‘दिव्या भारती आणि पूजा भट्ट माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघींचा स्वभाव देखील फार चांगला होता… मी दिव्यासोबत माझा अधिक काळ घालवला आहे… आम्ही एकत्र अनेकदा डिस्को आणि बार मध्ये  गेलो आहोत सलमान खान ज्याप्रमाणे माझा खास मित्र होता दिव्या देखील मला तितकीच जवळची होती. तासोंतास आम्ही गप्पा मारत बसायचो…’

दिव्याचा पैशांसाठी वापर करायचे…

दिव्या हिच्या खासगी आयुष्याबद्दल राजू म्हणाला, ‘तिला असं कायम वाटायचं की, तिचा गैरवापर होत आहे. दिव्याला वाटायचं, ती पैसे कमावत आहे काम करत आहे… म्हणून लोकं तिच्या पैशांचा गैरवापर करत आहेत… याच गोष्टीमुळे ती कायम दुःखी असायची…’

घटनास्थळी पोहोणारी सर्वात पहिली व्यक्ती…

दिव्या हिच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. राजू म्हणाला, ‘घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारा मी होतो आणि तेथून निधणारा देखील सर्वात पहिला मी होतो… मला मोठा धक्का बसला होता… प्रचंड दुःखद होतं… असं व्हायला नको हवं होतं…’

पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पडून मृत्यू

5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती तिच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून पडून मरण पावली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर ही घटना अपघात असल्याचं घोषित करण्यात आलं.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.