AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

IPL 2026, CSK vs DC: आयपीएल स्पर्धेतील 18वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं. यासह स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत
Image Credit source: CSK TWITTER
| Updated on: Apr 11, 2026 | 11:33 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 18 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलग तीन पराभवातून धडा घेत चेन्नई सुपर किंग्सने सावध सुरूवात केली. तसेच 20 षटकात 2 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 189 धावा करू शकला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 23 धावांनी जिंकला. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. यासह चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यात 2 गुण पडले आहेत.  तर दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी पाथुम निसंका आणि केएल राहुल ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. पण केएल राहुल 18 धावा करून बाद झाला. लगेचच पाथुम निसंका 41 धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर समीर रिझवी 6 धावा आणि अक्षर पटेल 1 धाव करून बाद झाल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघावर दबाव वाढला. डेविड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. पण 17 धावांवर असताना डेविड मिलर जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. आशुतोष शर्मा 19 धावा, तर अकिब नबी दार 4 धावांवर बाद झाला आणि पुन्हा दबाव वाढला. पण ट्रिस्टन स्टब्स एका बाजूने खिंड लढत होता. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्स सामन्यात राहिला. पण 60 धावांवर बाद झाला आणि सामना चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात झुकला.

चेन्नई सुपर किंग्सचा डाव

चेन्नई सुपर किंग्सकडून संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने सावध सुरूवात केली. पण संघाच्या 62 धावा असताना ऋतुराज गायकवाड बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारण्याचा नादात झेल बाद झाला. त्याने 18 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 15 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेची जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनची शतकी खेळी या निर्णायक ठरली. तर आयुष म्हात्रेने 36 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत 59 धावा केल्या. पण शेवटच्या दोन षटकांचा खेळ शिल्लक असताना त्याला रिटायर्ड आऊट होत जावं लागलं. त्यानंतर शिवम दुबे मैदानात आला आणि 10 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 20 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 56 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 115 धावांची खेळी केली.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....