AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न करून तू कोणता तीर मारलास? ट्रोलरवर भडकली शिल्पा शेट्टीची बहीण, थेट प्रोफाइलच केला शेअर

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला एका युजरने लग्नावरून आणि वयावरून ट्रोल केलं. यावर शमिताने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. लग्न करून तू कोणता मोठा तीर मारलास, अशा शब्दांत तिने संबंधित ट्रोलरला सुनावलं आहे.

लग्न करून तू कोणता तीर मारलास? ट्रोलरवर भडकली शिल्पा शेट्टीची बहीण, थेट प्रोफाइलच केला शेअर
Shamita Shetty
| Updated on: May 28, 2026 | 8:55 AM
Share

अभिनेत्री शमिता शेट्टी सोशल मीडियावर बिनधास्तपणे आपली मतं मांडण्यासाठी ट्रोलर्सना सडेतोड उत्तरं देण्यासाठी ओळखली जाते. बुधवारी एका युजरची कमेंट वाचून शमिताचा पारा पुन्हा चढला आणि तिने सोशल मीडियावर तिने त्याला सुनावलं. संबंधित युजर शमिताला सतत तिच्या वयावरून आणि लग्न न करण्यावरून आक्षेपार्ह कमेंट्स करत होता. अखेर तिने यावेळी त्याला धडा शिकवण्याचं ठरवलं. शमिताने फक्त त्याच्या कमेंटवर बेधडक उत्तर दिलंच नाही तर त्याच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉटसुद्धा स्टोरीवर शेअर केला आहे, ज्यावर पंकज मित्तल असं नाव दिसतंय.

शमिताचं सडेतोड उत्तर

शमिताने ट्रोलरला उत्तर देत लिहिलं, ‘मी या उत्तम संधीचा फायदा उचलत तुझ्या या उत्तम प्रतिक्रियेला उत्तर देऊ इच्छिते. तू म्हणतोस की, माझं आता वय झालं आहे, आता पहिल्यासारखी गोष्ट राहिली नाही. तर हो, अर्थातच मी आता पहिल्यापेक्षा वेगळी दिसेन. वेळेनुसार गोष्टी बदलतात आणि हा जीवनाचा एक पूर्णपणे नैसर्गिक भाग आहे. या जगात काहीही कायम तसंच राहत नाही, अगदी आपलं शारीरिक स्वरुपसुद्धा. पण माझ्या सध्याच्या वयानुसार मी पूर्णपणे निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी आहे. देवाने मला जे काही दिलंय त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे आणि माझ्यासाठी तेच सर्वांत महत्त्वाचं आहे.’

शमिताची पोस्ट-

संबंधित ट्रोलरने शमिताला केवळ वयावरूनच नाही तर लग्न न करण्यावरूनही टिप्पणी केली होती. ‘जर तू वेळेवर लग्न केलं असतंस, तर तुझी मुलं आज मोठी झाली असती’, असं त्याने म्हटलं होतं. शमितानेही यावरही सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मग? तू तर तेच बोललास जे सर्वांना आधीपासूनच माहीत आहे. पण त्याने काय? भावा, तू लग्न करून असा कोणता तीर मारला आहेस? सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू आमच्यासारख्या सिंगल महिलांना सोशल मीडियावर फॉलो का करतो? फक्त यासाठीच का की आम्हाला आमच्या वयावरून तुला टोमणा मारता येईल आणि तुझे पुरुषी, जुन्या जमान्याचे विचार आमच्यावर थोपवू शकशील? प्लीज.. माझ्यावर एक कृपा कर आणि मला आताच्या आता अनफॉलो कर’, असं तिने म्हटलंय.

शमिता शेट्टी ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण असून ती 47 वर्षांची आहे. तिने शाहरुख खानच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. त्यानंतर तिने ‘मेरे यार की शादी है’ आणि ‘जहर’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने ‘बिग बॉस 3’, ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी 9’ आणि ‘बिग बॉस 15’ यांसारख्या शोजमध्येही भाग घेतला होता.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता