Sharad Pawar : राज्यात टँकर आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर , शरद पवार यांचे राज्य सरकारला आवाहन काय? ज्ञानेश कुमार यांच्यावरून केंद्राला टोला
Sharad Pawar : शरद पवार हे सोलापूर आणि धाराशीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज ते पंढरपूर तालुक्यातील गावाला भेट देणार आहे. त्यापूर्वी पत्रकाराशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला मोठे आवाहन केले आहे. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात केंद्राला मोठा टोला हाणला आहे.

Sharad Pawar : दुष्काळसंदर्भात मी माहिती घेत आहे. आज मी पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावात जाणार आहे. उद्या सोलापूर येथे जाणार आहे. त्यानंतर भूम-परंडा आणि धाराशिव इथं जाणार आहे. माझ्या सोबत स्थानिक आमदार आहेत. मी काही प्राथमिक माहिती मागवली, त्यात पाणी, चारा आणि हाताला काम देणे अत्यंत आवश्यक आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी या जिल्ह्यातील टँकर आणि पाण्याच्या स्थितीची माहितीही दिली. त्यांनी या जिल्ह्यातील दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आणले.
सोलापूरमध्ये १३९ गावं बाधीत आहेत. इथं १३५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ४० विहीर आहेत. २१ इंधन विहिरी आहेत. माढामध्ये ११० टँकर आहे. एका जिल्ह्यात, एका तालुक्यात असे प्रमाण आहे. शेजारच्या जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. या दुष्काळग्रस्त पट्ट्यात मदतीची गरज आहे. धीर देण्याची गरज आहे. मला खात्री आहे की राज्य सरकारने जर केंद्र सरकारला हे पटवून दिलं तर भरीव मदत मिळेल. पाण्याच दिवसेंदिवस डिमांड वाढत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. खडकवासला आणि इतर धरणातील पाणी काळजीपूर्वक वापरले पाहिजे. आज पासून ते जवळपास जून पर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. पाण्याचा साठा यावर लक्ष दिल पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांच्यावरून केंद्रावर निशाणा
रामलीला मैदानावर विरोध आज महारॅली काढणार आहे, त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. त्याच्यामुळे आज आणि उद्या सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे आणि स्थानिक नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. मी जबाबदार माणूस आहे. जबाबदारीने भाष्य़ करत आहे, असे ते म्हणाले.
ही आराजकता नाही
ठाणे येथील भाजप यात्रेवरही पवारांनी भाष्य केले. मी त्यावर राजकीयदृष्ट्या बोलणार नाही. राजकारण आणू नये सर्वांनी मदत करावी ही आराजकता नाही. कोणी राजकारण आणू नये. संकटावर मात करावी लागेल. पाच हजार मदतीविषयी माझी दिल्ली आणि मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आहे, काहीतरी मार्ग काढला जाईल अशी खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
