AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा, विरोधकांवर गंभीर आरोप करत..

ठाण्यात लोकतंत्र बचाव पदयात्रेला महायुतीमधील नेते सहभागी झाले आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. विरोधकांवर त्यांनी जोरदार आरोप केले. मतचोरीवरही बोलताना एकनाथ शिंदे दिसले.

भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा, विरोधकांवर गंभीर आरोप करत..
Eknath Shinde
| Updated on: Nov 01, 2026 | 11:17 AM
Share

ठाण्यात लोकतंत्र बचाव पदयात्रेला महायुतीमधील नेते सहभागी झाले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गणेश नाईक एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. या पदयात्रेला लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीत भाषणादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, काही लोक म्हणतात की, मोदी आज जाणार उद्या जाणार… पण हा काय तुमच्या बाबाचा माल आहे का? तुम्ही देशासाठी काय केले, 2014 पूर्वीची परिस्थिती बघा म्हणत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या आंदोलनावरही त्यांनी जोरदार टीका केली. 2014 अगोदर पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवले जायचे. विरोधकांनी कोर्टावर मोर्चा काढला. 2014 च्या अगोदर शेण खाणेही सरकारने सोडले नाही. न्यायालयावरील आंदोलन हा काळा दिवस होता. लोकशाहीची अपमान विरोधकांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांनी निवडून दिले. जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. मोदींना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. विरोधक मोदींसह लष्करावर टीका करतात. पुढचे 50 वर्ष विरोधकांची सत्ता येणार नसल्याचे मोठे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. पुढे एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, तुम्ही काय चालवलंय.

तुम्ही पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करतात. देशातील जनता मोदींच्या मागे खंबीरपणे उभी आहे. मोदींनी देशासाठी काय केले हे सांगण्याची गरज नाही. इतर देशांमध्ये युद्ध सुरू असताना दुसऱ्या देशांची अर्थव्यवस्था टबघाईला आलेली असताना भारताची अर्थव्यवस्था जगात थेट 4 नंबरला गेली. मोदींकडून गरीबाचे काम केले जात आहे. एकही भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्यावर नाही.

मोदींवर तुम्ही आरोप करत आहात, पण ते तुमच्यावर लक्ष देत नाहीत. तुम्ही त्यांचा बाप काढता, त्यांना शिव्या देता? अरे कुठे फेडणार आहात हे पाप. अरे तुम्हाला माहिती टाकण्यासही माणूस उरणार नाही. ज्यांनी आपल्या आईचे निधन झाल्यानंतरही पुन्हा कामाला लागले. शोधूनही असा पंतप्रधान तुम्हाला मिळणार नाही. 32 कोटी जनतेला त्यांनी गरीबीतून बाहेर काढले.

तुम्हाला हे सहन होत नाही म्हणून तुम्ही विदेशात जाऊन भारताची आणि मोदींची बदनामी करतात. यात परकीय शक्तींचा हात आहे. परकीय शक्तींसोबत हात मिळून हे काम करतात आणि बदनामी करतात. पायलट स्मित मच्छार यांना तुम्ही एकही फोन केला नाही. त्यांचे काैतुक जगभरात करण्यात आले. स्मित मच्छार यांनी नरेंद्र मोदी माझे प्रेरणास्थान असल्याचे म्हटल्याने तुमच्या पोटात दुखले आणि तुम्ही त्यांना साधा फोनही केला नाही. विरोधकांवर टीका केली.

Follow Us
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?