आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीच्या धक्कादायक तक्रारीने खळबळ; नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता मुंबईतील एका मोठ्या बँकेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून संबंधित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेल्या देशातील एका नामांकित बँकेच्या शाखेत ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदार पतीच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून इस्लाम धर्माचा अभ्यास करत होती. तसेच ती बुरखा परिधान करणे, रोजा ठेवणे यासारख्या गोष्टी पाळत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याशिवाय पत्नीने स्वतः धर्मांतर करण्याची इच्छा व्यक्त केली असून मुलीचेही धर्मांतर करण्याबाबत चर्चा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बँकेतील कर्मचारी साफीन गोदल याच्यासोबत पत्नीचे संबंध असल्याचाही संशय पतीने व्यक्त केला आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Published on: May 27, 2026 06:26 PM
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय