Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या दिल्लीतील मोर्च्यामुळे आज राजधानीतील सहा मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. डीएमआरसीने सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राजीव चौक, मंडी हाऊससह प्रमुख स्टेशन्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने आज दिल्लीत मोठा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतुकीवर परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजधानीतील सहा प्रमुख मेट्रो स्टेशन्स आज, बुधवारी, सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
डीएमआरसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राजीव चौक, मंडी हाऊस, जनपथ, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय आणि बारखांबा रोड ही सहा मेट्रो स्टेशन्स आज पूर्णपणे बंद राहतील. इंडिया आघाडीच्या मोर्च्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना या मेट्रो स्टेशन बंदच्या माहितीची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Oct 12, 2026 10:07 AM
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच

