AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI कडून T20 WC टीममधील एका मोठ्या खेळाडूवर अन्याय का? 12 वर्षांपासून टीमचा भाग पण…

BCCI ने वर्ष 2025-26 च्या सीजनसाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. पण हे कॉन्ट्रॅक्ट जाहीर करताना एका खेळाडूवर मोठा अन्याय झालाय. माजी क्रिकेटपटू सुद्धा या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत.

BCCI कडून T20 WC टीममधील एका मोठ्या खेळाडूवर अन्याय का? 12 वर्षांपासून टीमचा भाग पण...
Team India Feature
| Updated on: Feb 10, 2026 | 10:30 AM
Share

BCCI ने 2025-26 च्या सीजनसाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टची घोषणा केली आहे. यात स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलचं नाव सुद्धा आहे. पण यावेळी अक्षर पटेलला डिमोशनचा सामना करावा लागलाय. त्यावरुन सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात वादविवाद सुरु आहेत. अक्षर पटेल तिन्ही फॉर्मेटचा प्लेयर आहे. टी 20 टीमचा व्हाइस कॅप्टन आहे. त्याशिवाय तो टीममधला एक सीनियर खेळाडू आहे. अशावेळी बीसीसीआयचा हा निर्णय फॅन्सना अजिबात आवडलेला नाही.

अक्षर पटेलचं नाव मागच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ग्रेड बी मध्ये होतं. पण नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला डिमोट करुन ग्रेड सी मध्ये टाकण्यात आलय. वर्ष 2024-25 च्या सेशनमध्ये अक्षर पटेल एकही टेस्ट मॅच खेळला नाही. म्हणूनच त्याला ग्रेड बी मधून ग्रेड सी मध्ये डिमोट करण्यात आलं असावं. त्याशिवाय तो वनडे आणि टी 20 सुद्धा कमी खेळलाय. त्यामुळे त्याची ग्रेड बदलण्यात आली असावी.

ग्रेड घटवणं हे समजण्यापलीकडे आहे

अक्षर पटेलची ग्रेड घटवण्यात आल्यामुळे त्याचे फॅन्स आणि काही क्रिकेट पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘अक्षर पटेलच्या जे हक्काचं आहे, ते सर्व मिळवण्यासाठी त्याला अजून काय करावं लागेल?’ असं आकाश चोपडाने एक्स हँडलवर म्हटलय. आकाश चोपडा प्रमाणेच अनेक क्रिकेट फॅन्सनीही असेच प्रश्न उपस्थित केलेत. अक्षर पटेल सारख्या महत्वाच्या खेळाडूची ग्रेड घटवणं हे समजण्यापलीकडे आहे असं एका युजरने लिहिलय.

आंतरराष्ट्रीय डेब्यु करुन 12 वर्ष झाली

अक्षर पटेलला आंतरराष्ट्रीय डेब्यु करुन 12 वर्ष झाली आहेत. या दरम्यान तो 15 टेस्ट, 71 वनडे आणि 88 T20I सामने खेळला आहे. या सर्व फॉर्मेटमध्ये मिळून त्याने 2200 पेक्षा जास्त धावा आणि 200 पेक्षा जास्त विकेट घेतलेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात