AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Withdrawal Facility PF : UPI द्वारे आता काढा PF; मोठी अपडेट समोर

UPI Withdrawal Facility PF : युपीआयद्वारे पीएफ काढण्याच्या सुविधेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. एटीएमद्वारे पीएफ काढण्यासंबंधीच्या प्रक्रियेला सुद्धा वेग आला आहे. युपीआयद्वारे पीएफ काढण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

UPI Withdrawal Facility PF : UPI द्वारे आता काढा PF; मोठी अपडेट समोर
ईपीएफओ, पीएफ, युपीआयImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 10, 2026 | 9:22 AM
Share

EPFO UPI Withdrawal Facility PF : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने यापूर्वीच युपीआय आणि एटीएम द्वारे पीएफ काढण्याची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी जून महिन्यापासून या सुविधा सुरू करण्याचा विचार होता. तांत्रिक कारणांमुळे ही योजना सातत्याने पुढे जात होती. आता एप्रिल महिन्यापासून युपीआयद्वारे पीएफ खात्यातील रक्कम थेट काढता येणार आहे. येत्या एप्रिलमध्ये नवीन डिझाईन केलेले मोबाईल ॲप्लिकेशन समोर येईल. या नवीन ॲपद्वारे ईपीएफओ सदस्यांना बँक खात्यात पैसे वर्ग करता येतील, अशी माहिती ईपीएफओच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली आहे.

काही हिस्सा गोठवणार

अर्थात EPF चा सर्वच पैसा खातेदारांना, सदस्यांना काढता येणार नाही. यातील 25 टक्के रक्कम गोठवण्याची शक्यता आहे. उर्वरीत रक्कमेतील एक मोठा हिस्सा युपीआयद्वारे कर्मचारी त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करू शकतील. इतकेच नाही तर नवीन ॲपच्या माध्यमातून पीएफ पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती घेता येईल. सध्या यासाठी सदस्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर पोर्टल अथवा उमंग ॲपचा वापर करतात. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध असलेच. पण नवीन ॲपच्या माध्यमातून सदस्यांना जलदगतीने पीएफ रक्कम काढता येईल. त्यासाठी अर्जफाटे करण्याची आणि वाट पाहण्याची गरज भासणार नाही. हा कर्मचार्‍यांसाठी मोठा दिलासा असेल.

वृतसंस्था PTI ने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ 3.0 संपूर्णपणे अपग्रेड झाल्यावर सदस्यांना सर्व सोयी-सुविधा या जलदगतीने मिळतील. या सुविधा पूर्णपणे डिजिटल असतील. त्यासाठी कुठलेही पेपर वर्क करावे लागलणार नाही. अर्जफाटे करावे लागणार नाही. सध्या पीएफ रक्कम काढण्यासाठी सदस्यांना अर्ज करावा लागतो. क्लेम, दावा मंजूर होण्यासाठी त्याला वाट पाहावी लागते. तर नवीन ऑटो सेटलमेंट मोड क्लेम सेटलमेंटसाठी किमान तीन दिवस घेते. ऑटो सेटलमेंटची मर्यादा आता 1 लाखांहून 5 लाख इतकी करण्यात आली आहे. तर नवीन युपीआय सुविधेने हे काम अत्यंत जलद आणि सुकर होणार आहे.

ईपीएफओ सदस्य आजारपण, शिक्षण, लग्न अथवा घर खरेदीसाठी वा इतर तातडीच्या खर्चासाठी ही रक्कम काढता येणार आहे. नव्या प्रणालीत कर्मचारी आपल्या युपीआय पिनचा वापर करून सुरक्षितपणे ही रक्कम काढू शकतील. ईपीएफओ त्यासाठीच्या तांत्रिक गोष्टीची लवकरच पूर्तता करणार आहे. त्यासाठी खास सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे.या नवीन प्रक्रियेसाठी EPFO ने NPCI सोबत करार केला आहे. BHIM ॲपच्या मदतीने EPFO सदस्य आरोग्य, शिक्षण, लग्न वा इतर खास कारणांसाठी पीएफची रक्कम काढू शकतील. याविषयीचा क्लेम त्यांना करता येईल.

Follow Us
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र नेमकी कसल
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र नेमकी कसल.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....