AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागली, किंमतीत 662 रुपयांची उसळी

देशांतर्गत बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 6 पैशांच्या वाढीसह 74.40 वर बंद झाला. आज सेन्सेक्स 138 अंकांच्या तेजीसह 52,975 वर बंद झाला तर निफ्टी 32 अंकांच्या तेजीसह 15856 च्या स्तरावर बंद झाला.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागली, किंमतीत 662 रुपयांची उसळी
सोनं
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 23, 2021 | 10:14 PM
Share

Gold Silver price नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील जोरदार तेजी दरम्यान, दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर 256 रुपयांनी वाढून, 46,698 रुपयांवर बंद झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. सोन्याचा मागील क्लोजिंग भाव प्रति 10 ग्रॅम 46,442 रुपये होता. चांदीदेखील 662 रुपयांनी वाढून 66,111 रुपये प्रति किलो झाली. मागील क्लोजिंग किंमत 65,449 रुपये होती. (Gold and silver prices rose by Rs 662 on the last day of the week)

आंतरराष्ट्रीय बाजारात सायंकाळी 4.45 वाजता सोने 9.15 डॉलरच्या घसरणीसह प्रति औंस 1,796.25 डॉलरवर व्यापार करीत होता. चांदीमध्येही घसरण दिसत आहे. 0.163 डॉलरच्या घसरणीसह ते प्रति बॅरल 25.218 डॉलर स्तरावर व्यापार करीत होते. देशांतर्गत बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 6 पैशांच्या वाढीसह 74.40 वर बंद झाला. आज सेन्सेक्स 138 अंकांच्या तेजीसह 52,975 वर बंद झाला तर निफ्टी 32 अंकांच्या तेजीसह 15856 च्या स्तरावर बंद झाला.

24 कॅरेट सोन्याची सराफा किंमत

आयबीजेए म्हणजेच इंडियन बुली ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा क्लोजिंग भाव दहा ग्रॅम 47703 रुपये आहे आणि चांदीची किंमत प्रति किलो 67039 रुपये आहे. यावेळी डॉलर निर्देशांकात वाढ दिसून येत आहे. 0.18% तेजीसह, ते 93 च्या स्तरावर आहे. बाँडच्या उत्पादनातही आज मोठी वाढ दिसून येत आहे. सद्यस्थितीत ते 1.93 टक्क्यांच्या तेजीसह 1.291 टक्के स्तरावर आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 0.12 टक्क्यांनी घसरून 73.72 डॉलर प्रति औंस स्तरावर आहे.

सोने वितरणामध्ये 280 रुपयांनी घसरण

एमसीएक्सवर सोन्याच्या वितरणात मोठी घट आहे. एमसीएक्सवर सायंकाळी 5.10 वाजता ऑगस्टच्या डिलीव्हरीसाठी असलेले सोन्याचे भाव 279 रुपयांनी घसरून 47,335 रुपयांवर होते. त्याचप्रमाणे ऑक्टोबर डिलीव्हरीचे सोने 332 रुपयांनी घसरून 47600 रुपये आणि डिसेंबर डिलीव्हरीचे सोने 86 रुपयांनी घसरून 48020 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत होते.

चांदीच्या वितरणात भारी घट

सोन्याखेरीज चांदीच्या वितरणातही आज घट आहे. एमसीएक्सवर सप्टेंबरच्या वितरणातील चांदी सध्या 443 रुपयांच्या घसरणीसह 66,931 रुपये प्रतिकिलोवर होती. त्याचप्रमाणे डिसेंबर डिलीव्हरीचा चांदीचा भाव 415 रुपयांच्या घसरणीसह 68170 रुपयांवर होता. (Gold and silver prices rose by Rs 662 on the last day of the week)

इतर बातम्या

केंद्राकडून महाराष्ट्राला मदत, एनडीआरएफची 26 पथकं, हवाईदलाचे 4 हेलिकॉप्टर्ससह लष्करही दाखल

आधार कार्डमध्ये ‘ही’ माहिती अपडेट करण्यासाठी घ्यावी लागेल अपॉईंटमेंट, असा बुक करा स्लॉट

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा