ऐन दिवाळीत सरकारचा मोठा निर्णय, सराफा बाजारात महाभूकंप? सोनं चांदी प्रचंड महागणार?

केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या आयातीवर 1 एप्रिल 2026 पासून 3% इंटिग्रेटेड जीएसटी (IGST) लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयातीवरील IGST सवलत यापुढे वाढवली जाणार नाही. यामुळे मौल्यवान धातूंची आयात महागणार असून, देशांतर्गत सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

ऐन दिवाळीत सरकारचा मोठा निर्णय, सराफा बाजारात महाभूकंप? सोनं चांदी प्रचंड महागणार?
Gold
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 3:56 PM

ऐन उत्सवाच्या दरम्यान केंद्र सरकारने सोने, चांदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या आयातीवर बँक आणि नियुक्त केलेल्या एजन्सींना 1 एप्रिल 2026 पासून 3 टक्के इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) द्यावी लागणार आहे. सोने आणि मौल्यवान धातूंच्या आयातीवर आयजीएसटीतून सूट मिळवणाऱ्या संबंधित बँका आणि एजन्सीची यादी 31 मार्च 2026 नंतर पुढे वाढवण्यात आलेली नाही. या टॅक्समुळे सोन्याची आयात महाग होण्याची शक्यता आहे.

रेव्हेुन्यू सेक्रेटरी अरविंद श्रीवास्तव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सोने आणि महागड्या धातूंच्या आयातीवर आयजीएसटीपासून सूट मिळवण्यासाठी नियुक्त बँका आणि एजन्सींची यादी 31 मार्च 2026 नंतर वाढवली जाणार नाही, अशी माहिती सरकारने जीएसटी परिषदेत दिली आहे. बुलियन आणि इतर अन्य माध्यमातून होणाऱ्या सोने आणि किमती धातूंच्या आयातीवर लागणाऱ्या करांमध्ये समानता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

Loading...

ही व्यवस्था कधी सुरू होणार

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या आयातीवर तीन टक्के आयजीएसटी लावण्यात येतो. 1 एप्रिल 2026 पूर्वी बँक आणि सरकार द्वारे वेळोवेळी अधिसूचित नियुक्त एजन्सींकडून या किमती धातूंच्या आयातीवर आयजीएसटीतून सूट मिळत होती. सरकारने यावर्षी 1 एप्रिल रोजी नियुक्त बँका आणि एजन्सींची यादी अधिसूचित केली नाही. दरम्यान, मौल्यवान धातूंच्या आयातीमुळे होणारं परकीय चलनाचं प्रचंड विथड्रॉवल सरकारसाठी चिंतेचा विषय बनला होता.

ही सवलत 2017मध्ये सोन्यासाठी सुरू झाली होती. त्यानंतर चांदी आणि प्लॅटिनमपर्यंत वाढली. त्यामुळे इंपोर्टर्सला आयजीएसटी देण्यापासून दिलासा मिळाला. हा दिलासा अप्रूव्हड ट्रेडर्सच्या द्वारे बुलियनचा फ्लो सहज बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आला होता. आता ही सूट संपल्यानंतर इंपोर्टर्ससाठी सोन्याची आयात करणं अधिक महागडं ठरणार आहे.

पंतप्रधानांची अपील

चीननंतर भारत हा जगातील दुसरा मोठा सोने खरेदीदार आहे. सोन्याची आयात मुख्यत्वे ज्वेलरी उद्योगाच्या मागणीतून संचलित होते. सरकारने मे महिन्यात मौल्यवान धातूंच्या आवश्यक नसलेल्या आयातीवर अंकूश लावण्यासाठी सोने आणि चांदीवर आयात शुल्क सहा टक्क्याने वाढवून 15 टक्के केले होते. तर प्लॅटिनमवरील शुल्क 6.4 टक्क्याने वाढवून 15.4 टक्के करण्यात आले आहे.

ईराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याने आयात बिल वाढल्याने रुपयांवर दबाव वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने खरेदी करण्यापासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक वर्ष 2026-2027 च्या एप्रिल ऑगस्टमध्ये सोन्याची आयात 3.38 टक्क्याने वाढवून 17.47 अब्ज डॉलर झाली आहे. तर चांदीची आयात 8.81 टक्क्याने घटून 1.74 अब्ज डॉलर झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us