Gold Price Today : अधिकमासात आणखी एक गुड न्यूज, सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त.. 10 ग्रॅमसाठी आजचा दर..
Gold Price Today 19 May 2026 Latest News Updates in Marathi : अधिकमास सुरू झाला असून या महिन्यात जावयाला वाण देण्याची पद्धत असते. याच महिन्यात,सोन्याने देखील गुड नयुजू दिली असून त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशांतील प्रमुख शहरांत आज सोन्याचे आणि चांदीचे दर किती ?

Gold Rate Today In India : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना परदेश प्रवास टाळण्यातचे तसेच सोन-चांदीत गुंतवणूक, खरेदी कमी करण्याचेआवाहन केले असले तरीही सध्या लग्नसराईचा मौसम असून दोन्ही धातूंच्या खरेदीला जोर चढलेला आहे. वाढत्या भावांमुळे ग्राहक सोनं विकत घेताना 10 वेळा विचार करत आहेत, मात्र दागिने घडवण्याची, विकत घेण्याची हौस काही कमी झालेली दिसत नाही. याचदरम्यान आता देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव सलग दुसऱ्या दिवशीही कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाल आहे.
दिवसभर स्थिर राहिल्यानंतर, आज, 19 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक फिकी पडली आहे. या दोन दिवसांत, 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 710 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोने 660 रुपयांनी स्वस्त झाल्याचं दिसून आलं. आज राजधानी दिल्लीत 10 ग्रॅमचं 24 कॅरेट सोने 10 रुपयांनी स्वस्त झाले, तर 22-कॅरेट सोनेही 10 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र, एक दिवस स्थिर राहिल्यानंतर दिल्लीत चांदी सलग दुसऱ्या दिवशी महाग झाली असून, या दोन दिवसांत चांदीच्या दरात प्रति किलोग्राम 10,100 रुपयांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, बॉण्ड यील्डमधील वाढ आणि अमेरिका-इराण कराराबाबतची अनिश्चितता यामुळे त्यांच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहे. तसेच, त्यांच्या आयातीवरील शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवण्यात आले आहे, याचाही किमतींवर परिणाम होताना दिसत आहे. चांदीची चमक वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे चांदीचे अनेक प्रकार ‘फ्री’ आयात यादीतून काढून ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की, आता सरकारी मंजुरीशिवाय चांदीचे अनेक प्रकार आयात करता येणार नाहीत. त्यामुळेही चांदीची किंमत चांगलीच वाढली आहे.
सिटीवाईज सोन्याचे भाव किती ?
देशातील 10 मोठ्या शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट शुद्धता असलेलं 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया..
| शहर | 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर | 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर | 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर |
| दिल्ली | ₹1,56,360 | ₹1,43,340 | ₹1,17,310 |
| मुंबई | ₹1,56,210 | ₹1,43,190 | ₹1,17,160 |
| कोलकाता | ₹1,56,210 | ₹1,43,190 | ₹1,17,160 |
| चेन्नई | ₹1,60,090 | ₹1,47,490 | ₹1,23,090 |
| बंगळुरू | ₹1,56,210 | ₹1,43,190 | ₹1,17,160 |
| हैदराबाद | ₹1,56,210 | ₹1,43,190 | ₹1,17,160 |
| लखनऊ | ₹1,56,360 | ₹1,43,340 | ₹1,17,310 |
| पाटणा | ₹1,56,260 | ₹1,43,240 | ₹1,17,210 |
| जयपुर | ₹1,56,360 | ₹1,43,340 | ₹1,17,310 |
| अहमदाबाद | ₹1,56,260 | ₹1,43,240 | ₹1,17,210 |
सलग दुसऱ्या दिवशी चांदीला झळाळी
चांदीबद्दल बोलायचं झालं तर, एक दिवस स्थिर राहिल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी तिच्या दरात वाढ झाली आहे. याआधी सलग तीन दिवस एक किलो चांदी बरीच स्वस्त झाली होती. आजच्या दिवसाबद्दल सांगायचं झाल्यास, दिल्लीत चांदी प्रति किलो 100 रुपयांनी महाग झाली असून ती 2,90,000 रुपयांना विकली जात आहे. इतर महत्त्वाच्या महानगरांबद्दल सांगायचं झालं तर मुंबई आणि कोलकाता येथेही चांदीचा तोच दर आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा भाव सर्वाधिक असून ती 3, 00, 100 रुपये इतक्ाय दराने विकली जात आहे.