Gold Price Today: सोन्यात मोठा उलटफेर! तीन दिवसात किंमतीत तुफान, काय आहे भाव?

Gold And Silver Price Today: सोने आणि चांदीने गेल्या तीन दिवसांपासून डाव पालटवला आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत दोन्ही धातूत मोठी उसळी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही धातुतील उसळीमुळे ग्राहक मात्र हिरमुसले आहेत. काय आहेत आता किंमती?

Gold Price Today: सोन्यात मोठा उलटफेर! तीन दिवसात किंमतीत तुफान, काय आहे भाव?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Nov 27, 2025 | 9:58 AM

सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन(IBJA) नुसार, गुरुवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढून 1,26,081 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 1,59,025 रुपयांवर पोहचला आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, सोने आणि चांदीच्या किंमतीत स्थानिक करासह मोठी वाढ झाली आहे. तर जागतिक बाजारात सोने 4,164.30 डॉलर प्रति औंसवर आहे. तर चांदीत वाढ होऊन 52.37 डॉलर प्रति औंसवर आहे. वायदे बाजारात(MCX) सोन्याचा सौदा वाढून 1,25,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर चांदीचा सौद्यात वाढ होऊन एका किलोसाठी हा भाव 1,57,709 रुपयांवर पोहचला आहे.

गेल्या तीन दिवसात सोन्यात मोठी वाढ

25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1 ग्रॅम मागे 191 रुपयांची वाढ झाली. तर 26 नोव्हेंबर रोजी 1 ग्रॅम सोन्याची किंमत 87 रुपयांनी वाढली. तर आज सकाळच्या सत्रात ही वाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, आज सकाळी एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 12,807 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 11,741 रुपये इतका आहे.

चांदीचा ही दरवाढीचा तडाखा

25 नोव्हेंबर रोजी चांदी किलोमागे 4 हजार रुपयांनी महागली. तर 26 नोव्हेंबर रोजी हा भाव 2 हजारांनी वधारला. आज सकाळच्या सत्रात बाजारातील संकेतानुसार 4 हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचा भाव 1,73,000 रुपये इतका आहे. गेल्या तीन दिवसात चांदीने मोठी उसळी घेतली आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us