सोन्याची चकाकी मावळली, चांदीला झळाळी! आज सराफा बाजारात होते हे चित्र

| Updated on: Jun 25, 2021 | 11:52 PM

डॉलरची वाढती किंमत तसेच इतर विविध जागतिक कारणांमुळे सोने आणि चांदी गेल्या काही व्यापार सत्रांत विशिष्ट कक्षेत व्यापार करीत आहेत. (Gold prices fell today, a picture that was in the bullion market)

सोन्याची चकाकी मावळली, चांदीला झळाळी! आज सराफा बाजारात होते हे चित्र
सोन्याची चकाकी मावळली, चांदीला झळाळी!
Follow us on

मुंबई : सराफा बाजारात शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली, तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 66 रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम 46309 रुपयांवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 46375 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. चांदीच्या किंमतीत आज 332 रुपयांची वाढ नोंद झाली. आजच्या वाढीनंतर चांदीचा भाव 67248 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गुरुवारी तो प्रति किलो 66916 रुपयांवर बंद झाला होता. डॉलरची वाढती किंमत तसेच इतर विविध जागतिक कारणांमुळे सोने आणि चांदी गेल्या काही व्यापार सत्रांत विशिष्ट कक्षेत व्यापार करीत आहेत. (Gold prices fell today, a picture that was in the bullion market)

एमसीएक्सवर सोन्याचा दर

एमसीएक्सवर सोन्याच्या वितरणात सध्या तेजी दिसून येत आहे. दुपारी 3.40 वाजता ऑगस्ट महिन्यातील डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 132 रुपयांनी वाढून 47,002 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. ऑक्टोबरमध्ये डिलीव्हरीसाठी असलेल्या सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 178 रुपयांच्या वाढीसह 47346 रुपयांवर होता.

एमसीएक्सवर चांदीचा दर

एमसीएक्सवर चांदीच्या डिलीव्हरीमध्येही तेजी दिसून आली. यावेळी चांदीचा भाव जुलैच्या वितरणासाठी 496 रुपयांच्या वाढीसह 68229 रुपयांवर होता. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या वितरणासाठी चांदीचा दर 501 रुपयांनी वाढून 69250 रुपये प्रति किलोवर होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज सोने 6.05 (+0.34%) डॉलरच्या तेजीसह प्रति औंस 1782.75 डॉलरवर सोने होते. यावेळी चांदीमध्येही तेजी दिसून आली आहे. चांदी 0.208 (+0.80%) डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 26.258 डॉलरच्या पातळीवर व्यापार करीत आहे.

2 पैशांच्या कमजोरीसह रुपया बंद झाला

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणीसह बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांच्या घसरणीसह 74.20 वर बंद झाला. यावेळी डॉलर निर्देशांकात घट आहे. 0.035 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 91.760 च्या पातळीवर होता. हा निर्देशांक जगातील इतर सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद सिद्ध करत आहे.

कच्च्या तेलाची किंमत

यावेळी कच्च्या तेलाच्या किमतीमध्येही किंचित घट दिसून येत आहे. कच्चे तेल 0.31 डॉलर (-0.41%) घसरणीसह प्रति बॅरल 75.25 डॉलरवर व्यापार करीत आहे. डब्ल्यूटीआय क्रूडमध्येही घट झाली आहे. हे 0.30 डॉलर (-0.41%) घसरणीसह प्रति बॅरल 73.00 डॉलरवर व्यापार करीत होते. (Gold prices fell today, a picture that was in the bullion market)

इतर बातम्या

Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ

भारतात Nokia चा पहिला 5G फोन लवकरच लाँच होणार, ‘या’ स्मार्टफोन्सची एंट्री