भारतात Nokia चा पहिला 5G फोन लवकरच लाँच होणार, ‘या’ स्मार्टफोन्सची एंट्री

स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार करीत HMD ने या वर्षाच्या सुरूवातीस युरोप आणि इतर काही बाजारात नोकिया एक्स 20 (Nokia X20) स्मार्टफोन सादर केला होता.

भारतात Nokia चा पहिला 5G फोन लवकरच लाँच होणार, 'या' स्मार्टफोन्सची एंट्री
Nokia X20
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 11:09 PM

मुंबई : स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार करीत HMD ने या वर्षाच्या सुरूवातीस युरोप आणि इतर काही बाजारात नोकिया एक्स 20 (Nokia X20) स्मार्टफोन सादर केला होता. Nokia X20, Nokia X10 सह, कंपनीच्या 5 जी फोन कॅटेगरीमध्ये Nokia 8.3 5G देखील सामील झाला आहे. मात्र आतापर्यंत एचएमडीने भारतात 5 जी फोन लाँच करणार की नाही, याबाबत खुलासा केला नव्हता. कारण एचएमडी कंपनी भारतात चिनी प्रतिस्पर्ध्यांइतकी सक्रिय नाही. त्यामुळेच एचएमडीने अद्याप भारतात 5 जी फोन लाँच केलेला नाही. मात्र कंपनी आता हा चित्र बदलण्याच्या तयारीत आहे. (Nokia X20 : Nokia can launch their first 5G phone in India very soon)

कंपनीच्या वेबसाइटनुसार नोकिया एक्स 20 आणि नोकिया एक्स 10 लवकरच भारतात लाँच होणार आहेत. ही बाब स्पष्टपणे घोषित केलेली नसली, तरी नोकिया मोबाइलच्या वेबसाइटवर एक विभाग आहे, जो मोबाइल फोनच्या एसएआर (स्पेसिफिक अब्जोर्बेशन रेट) बद्दल माहिती देतो. यावरील एका यादीत नोकिया एक्स 20 आणि नोकिया एक्स 10 स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. नोकियामोबने (NokiaMob) वेबसाइटवरील ड्रॉपडाऊनमध्ये भारताची निवड केली आहे. कंपनीने Nokia X20 आणि Nokia X10 ची SAR व्हॅल्यू सादर केली आहे, जी दूरसंचार विभागाने निश्चित केलेल्या पॅरामीटर्सचे पालन करतात.

फोन मॉडल्सच्या SAR डिटेल्सचा वेबसाइटवर समावेश

केवळ X20 आणि X10 नव्हे, वेबसाइटवर Nokia G20, Nokia G10, Nokia C20 आणि Nokia C10 फोनचादेखील समावेश करण्यात आला आहे. नोकिया कंपनी Nokia X20, Nokia X10, Nokia G20 आणि सर्व नवीन फोन त्यांच्या SAR व्हॅल्यूसह वेबसाईटवर उपलब्ध आहेत. म्हणून हे गृहित धरणे सुरक्षित आहे की, एचएमडी लवकरच सर्व फोन भारतात लॉन्च करण्याची योजना आखत आहे. तथापि, एचएमडीने अद्याप फोन लॉन्च करण्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही आणि कंपनीचा भारतातील ट्रॅक रेकॉर्ड पाहता हे फोन भारतात लाँच करण्यासाठी कंपनी कोणतीही घाई करणार नाही. त्यामुळे नोकियाच्या 5 जी फोनसाठी ग्राहकांना वाट पाहावी लागू शकते.

भारतात स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी एचएमडीला घाई नाही. परंतु कंपनीला हा दृष्टीकोन लवकर बदलण्याची गरज आहे. भारतात अद्याप नोकियाकडून कोणताही 5 जी लाँच करण्यात आलेला नाही. दुसऱ्या बाजूला जवळजवळ प्रत्येक ब्रँडने 5 जी फोन भारतात लॉन्च केले आहेत. एचएमडी कंपनीच्या या आळशी वृत्तीमुळे 2021 च्या पहिल्या तिमाहीत नोकिया स्मार्टफोनच्या विक्रीत लक्षणीय घट झाली. काउंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालात असे दिसून आले आहे की, 2021 च्या पहिल्या तिमाहीत नोकिया स्मार्टफोनची निर्यात तब्बल 38.5 टक्क्यांनी घटली आहे.

HMD ने अद्याप Nokia X20 आणि अन्य फोन भारतात लाँच करण्याची कोणतीही योजना सादर केलेली नाही. परंतु त्यांची वेबसाईट या फोनच्या लाँचिंगचे संकेत देत आहे. त्यामुळे कंपनी आगामी काळात भारतात 5 जी फोन लाँच करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या

‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर

OnePlus Community Sale : मोबाईलपासून स्मार्ट टीव्हीपर्यतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट

नवा फोन घेताय? ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी

(Nokia X20 : Nokia can launch their first 5G phone in India very soon)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.