AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर

तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सॅमसंग कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे.

'या' कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर
Samsung electronic items
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 7:51 PM
Share

मुंबई : तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सॅमसंग कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. यात स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटरपासून ते मायक्रोवेव्हपर्यंतच्या विविध वस्तूंवर भारी सवलत दिली जात आहे. इतकेच नव्हे तर निवडक बँकांच्या कार्ड पेमेंटवर 20 टक्क्यांपर्यंतच्या कॅशबॅकसह अतिरिक्त सूटही मिळू शकेल. स्मार्ट टीव्हीवर सर्वाधिक सवलत दिली जात आहे. ग्राहक 30 जूनपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (Samsung offering heavy discounts on electronic items including smart TVs, refrigerators; get 20 percent cash back)

सॅमसंगने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अ‍ॅक्सिस बँक, फेडरल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अशा अनेक नामांकित बँकांसह भागीदारी केली आहे. या अंतर्गत एसबीआय ग्राहकांना उत्पादनांवर अतिरिक्त सूट देत आहे. निवडक साऊंडबारवर ग्राहकांना 6000 रुपयांपर्यंत अतिरिक्त 10% कॅशबॅक मिळू शकेल.

स्मार्ट टीव्हीसोबत साऊंडबार फ्री

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल तर सॅमसंगच्या 75 इंच किंवा त्यापेक्षा जास्त QLED टीव्ही मॉडेल्सच्या खरेदीवर 99,000 रुपयांपर्यंतचे साऊंडबार मोफत मिळू शकतात. या ऑफरमध्ये ग्राहकांना Q800T मोफत मिळेल, ज्याची किंमत 48,990 रुपये इतकी आहे. त्याशिवाय सॅमसंग QLED टीव्ही (65 इंच आणि त्याहून मोठे टीव्ही) किंवा UHD टीव्हीच्या (75 इंच आणि त्याहून मोठे टीव्ही) खरेदीवर साऊंडबार T450 विनामूल्य उपलब्ध असेल.

कॅशबॅक ऑफर

निवडक टेलिव्हिजन मॉडेल्स आणि इतर वस्तूंच्या खरेदीवर सॅमसंग आपल्या ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 20% कॅशबॅक ऑफर करत आहे. त्याच वेळी, ठराविक साउंडबारवर ग्राहकांना 6000 रुपयांपर्यंत अतिरिक्त 10% कॅशबॅक मिळू शकेल.

सॅमसंग रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्हवर शानदार ऑफर

सॅमसंग कर्ड मेस्ट्रो, फ्रॉस्ट फ्री अँड डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरवर 15 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देत आहे. कंपनी आपल्या मायक्रोवेव्हच्या खरेदीवर 10% कॅशबॅक तसेच मॅग्नेट्रॉनवर अतिरिक्त 5 वर्षाची वॉरंटी देत ​​आहे.

इतर बातम्या

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री

(Samsung offering heavy discounts on electronic items including smart TVs, refrigerators; get 20 percent cash back)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.