48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

ग्लोबल प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने (Tecno) शुक्रवारी 'स्पार्क 7 टी' (Spark 7T) हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999
Tecno Spark 7T

मुंबई : ग्लोबल प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने (Tecno) शुक्रवारी ‘स्पार्क 7 टी’ (Spark 7T) हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 6000 mAh क्षमतेच्या बॅटरीसह स्वस्त किंमतीत सादर करण्यात आला आहे. (Tecno Spark 7T launched with 48 MP Camera and 6,000mAh Battery in less Price)

स्पार्क 7 टी हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मॅग्नेट ब्लॅक, ज्वेल ब्लू आणि नेबुला ऑरेंज या रंगांचा समावेश आहे. हा फोन 15 जूनपासून Amazon या ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध होईल. स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तथापि, लॉन्च डे ऑफर म्हणून, हा फोन 15 जून रोजी केवळ 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

Tecno Spark 7T चे फीचर्स

स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी + आयपीएस डिस्प्ले आहे. 90.34 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो, 269 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि 480 निट ब्राइटनेस एक इमर्सिव व्ह्यूईं अनुभव प्रदान करतो. म्हणजेच, या फोनच्या स्क्रीनवर व्हिडीओ पाहण्याचा अनुभव खूप चांगला आहे. स्मार्टफोनला 36 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळतो.

Spark 7T चं स्पेसिफिकेशन

टेक्नो स्पार्क 7 टी 48 एमपी प्लस एआय लेन्स रीअर कॅमेरा क्वाड फ्लॅशसह सुसज्ज आहे, जो युजर्सना स्पष्ट आणि विस्तृत फोटो कॅप्चर करण्यास सक्षम करतो. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन व्हिडीओ बोकेह, टाइम-लॅप्स, स्लो मोशन, एआय पोर्ट्रेट, स्माइल शॉट फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये हेलियो G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉयड 11 वर आधारित एचआईओएस 7.6 वर चालतो.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

(Tecno Spark 7T launched with 48 MP Camera and 6,000mAh Battery in less Price)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI