AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवा फोन घेताय? ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी

कमी किंमतीत एखादा दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या ठराविक मोबाईल्सच्या किंमतींमध्ये कपात केली आहे.

नवा फोन घेताय? 'या' 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी
Samsung Galaxy Z Fold 2
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 6:05 PM
Share

मुंबई : कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन प्रत्येकालाच हवा असतो. जवळपास सर्वच स्मार्टफोन कंपन्या त्यासाठी प्रयत्नशील असतात. जर तुम्हीदेखील कमी किंमतीत एखादा दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण काही स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या ठराविक मोबाईल्सच्या किंमतींमध्ये कपात केली आहे. (Top 5 smartphones with heavy discounts, Price reduction up to Rs 15000, here is full list)

आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक यादी घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये असे काही स्मार्टफोन्स आहेत, ज्यांच्या किंमती नुकत्याच कमी करण्यात आल्या आहेत. या लिस्टमधील टॉप 5 स्मार्टफोन्समध्ये असूस ROG फोन 3. शाओमी मी 10, मोटो एड्ज+, ओप्पो फाइंड X2 आणि सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 2 चा समावेश आहे.

ASUS ROG Phone 3

असूसने या वर्षी ROG फोन 5 लाँच केला आहे. हा फोन 50,000 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. जर आपल्याला 50,000 रुपये खर्च करायचे नसतील तर आपण जुन्या असूस ROG फोन 3 ची निवड करु शकता. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याची किंमत 49,000 रुपये इतकी आहे. परंतु आता या फोनची किंमत 41,999 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. या फोनचं 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 41,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Xiaomi Mi 10

शाओमीने गेल्या वर्षी हा फोन लॉन्च केला होता. Mi 10 शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह येतो. हा फोन लॉन्च करण्यात आला होता तेव्हा त्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 50,000 रुपये इतकी होती. दरम्यान, आता शाओमी मी 10 ची किंमत 44,999 रुपये इतकी आहे. म्हणजेच या फोनवर तुम्ही 5000 रुपये वाचवू शकता. तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 49,999 रुपये मोजावे लागतील. या फोनची मूळ किंमत 54,999 रुपये आहे.

Motorola Edge+

मागील वर्षी मोटोरोलाने पॉवरफुल मोटो एज + लाँच कोला होता. या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 12 जीबी रॅमसह येतो. भारतात या डिव्हाइसची किंमत 75,000 रुपये इतकी आहे. पण आता या फोनची किंमत कमी करण्यात आली असून या फोनची किंमत 64,999 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

Oppo Find X2

ओप्पो फाइंड X2 गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला कंपनीचा सर्वात महागडा फोन होता. हा फोन लाँच केला होता तेव्हा त्याची किंमत 65,000 रुपये होती. या डिव्हाइसमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस आहे. यात स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये 65W चार्जर देण्यात आला आहे, जो या यादीत सर्वात वेगवान आहे. सध्या या फोनची किंमत 57,990 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy Z fold 2

Samsung Galaxy Z fold 2 या यादीतील सर्वात महाग फोन आहे. हे सॅमसंगचं फोल्डेबल डिव्हाइस आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झाला होता. हा फोन सुपर एमोलेड सेकेंडरी डिस्प्ले आणि एफएचडी + प्रायमरी डिस्प्लेसह येतो. Samsung Galaxy Z fold 2 मध्ये स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आहे जो 12 जीबी रॅमसह येतो. Samsung Galaxy Z fold 2 ची किंमत 1.35 लाख रुपये आहे. परंतु आता हा फोन 15,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

इतर बातम्या

Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

(Top 5 smartphones with heavy discounts, Price reduction up to Rs 15000, here is full list)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.