Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी

ई-कॉमर्स जायंट फ्लिपकार्टने (Flipkart) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बिग सेव्हिंग डेज सेलचे (Big Saving Days 2021) आयोजन केले आहे.

Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी
Realme Narzo 30 Pro 5g
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 11:19 PM

मुंबई : ई-कॉमर्स जायंट फ्लिपकार्टने (Flipkart) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बिग सेव्हिंग डेज सेलचे (Big Saving Days 2021) आयोजन केले आहे. ही विक्री 13 जूनपासून सुरू झाली आहे आणि 16 जूनपर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये ROG फोन 3 च्या खरेदीवर कंपनीकडून डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. मोटोरोलाने Moto Razr 5G, Moto 60 आणि Moto G10 Power च्या खरेदीवर सूट देण्याची घोषणा केली आहे. (Flipkart Big Saving Days sale 2021: Best deals on these smartphones)

Realme ने जाहीर केले आहे की, कंपनी फ्लिपकार्ट आणि रिअलमी डॉट कॉमवर त्यांच्या विविध उत्पादनांवर सूट देणार आहे. यामध्ये Narzo 30 Pro, Realme X7 आणि Realme 8 Pro चा समावेश आहे. कंपनीने असेही जाहीर केले आहे की 13 जूनपासून सर्व युजर्स या डिस्काऊंट ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

स्मार्टफोन खरेदीवर सवलत जाहीर करण्याव्यतिरिक्त, रियलमीने अशीदेखील घोषणा केली आहे की, ग्राहक एसबीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे किंवा ईएमआय व्यवहारांद्वारे फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेजमधील खरेदीवर 1000 रुपयांपर्यंत त्वरित सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

Realme च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

Realme ने जाहीर केले आहे की Realme X50 Pro 5G च्या खरेदीवर 17,000 रुपयांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे Realme X3 Super Zoom आणि Realme Pro अनुक्रमे 6,000 आणि 4,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध असतील. याशिवाय फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये Realme X7 Pro 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर Realme कंपनी 3,000 रुपयांची सूट देत आहे.

Realme Narzo 30 Pro स्मार्टफोनच्या खरेदीवर 2,000 रुपये आणि Narzo 30 Pro, Realme 8, Realme C12 आणि Realme C15 या स्मार्टफोन्सवर प्रत्येकी 1,000 रुपये सूट देण्यात आली आहे. Realme C20 आणि Realme C20 स्मार्टफोनच्या खरेदीवरही कंपनी खास ऑफर देत आहे. अन्य स्मार्टफोन आणि डिव्हाईसेसवरील बंपर डील्सबाबतची माहिती घेण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट किंवा Realme.com ला भेट देऊ शकता.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

(Flipkart Big Saving Days sale 2021: Best deals on these smartphones)

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.