AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपपंतप्रधानाच्या नातवाकडून महिलांवर सामूहिक अत्याचार? पाकिस्तानात एकच खळबळ; कोर्टाने तो आदेश दिला, आता…

दोन महिलांनी मोहम्मद रजा डार आणि इतर सात जणांंविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. यातील एक महिलाही व्हेनेझुएला आणि नेदरलँडची आहे. या दोन्ही महिला मोहम्मद रजा डार याला 2025 साली सिंगापूरमध्ये भेटल्या होत्या.

उपपंतप्रधानाच्या नातवाकडून महिलांवर सामूहिक अत्याचार? पाकिस्तानात एकच खळबळ; कोर्टाने तो आदेश दिला, आता...
ishaq darImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 8:09 PM
Share

Pakistan News : पाकिस्तान हा देश नेहमीच आपली नाचक्की करून घेतो. या देशात कधी काय होईल हे सांगातच येत नाही. गेल्या काही दिवसांपासून माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबल्याच्या मुद्द्यावरून येथे राजकीय अस्थिरता आहे. महागाई आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही गंभीर होत चाललाय. असे असतानाच पाकिस्तानात खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे. येथे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्या नातवाचा धक्कादायक कांड समोर आलाय. त्याच्यावर सामूहिक बलात्काराचे आरोप करण्यात आले असून तो चांगलाच फसलाय.

न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांचा नातू मोहम्मद रजा डार याच्यासह सर्व आठ जणांवर सामूहिक बलात्कार, अपहरणाच्या आरोपांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती रफकत अली गोंडल यांनीच हा निर्णय दिला असून 9 डिसेंबर 2026 रोजी पुरावे सादर करण्याचाही आदेश दिलाय. म्हणजेच आता मोहम्मद रजा डार तसेच इतर आठ जणांविरोधात अधिकृतपणे खटला चालवला जाणार असून त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. मोहम्मद रजा डार याच्यासह सर्व आठ आरोपींनी आरोप फेटाळले आहेत.

नेमकं प्रकरण काय, आरोप काय?

एकूण दोन महिलांनी मोहम्मद रजा डार आणि इतर सात जणांंविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. यातील एक महिलाही व्हेनेझुएला आणि नेदरलँडची आहे. या दोन्ही महिला मोहम्मद रजा डार याला 2025 साली सिंगापूरमध्ये भेटल्या होत्या. या भेटीत दोन महिलांनी रजा डारला त्यांच्या क्रिप्टोकरन्सी कंपनीत चार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती केली होती.

शहरं फिरवली नंतर बंदी बनवलं

त्यानंतर जून 2026 मध्ये रजा डारने या दोन्ही महिलांना आणखी गुंतवणूकदारांची ओळख करून देण्यासाठी पाकिस्तानात बोलवलं होतं. या दोन्ही महिलांना मोहम्मद डारने इस्लामाबाद तसेच मुरी शहरात फिरवलं होतं. त्यानंतर लाहोर येथील उच्चभ्रू भागात एका घरात या दोन महिलांना नेऊन त्यांना बंदी बनवण्यात आलं.

धकमावत दोन्ही महिलांवर अत्याचार

बंदूक, चाकू, काचेचे तुकडे यांचा धाक दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने 19500 डॉलर ट्रान्सफर करून घेण्यात आले. त्यानंतर या दोन्ही महिलांवर अत्याचार करण्यात आला. दरम्यान, आता या प्रकरणात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!