Gold Price Today : सोन्याची गाडी सुस्साट, दरवाढीला ब्रेक लागेनाच… आजचे नवे दर किती ?

Gold Price Today 22 May 2026 latest News Updates in Marathi: देशांतर्गत अनेक शहरातील सोन्याचे भाव समोर आले असून सोन्याची दरांची घोडदौड सुरूच आहे. आजही सोन्याचे आणि चांदीचे दर वाढलेले दिसले. तुम्चाय शहरात आज किती आहे भाव ?

Gold Price Today : सोन्याची गाडी सुस्साट, दरवाढीला ब्रेक लागेनाच... आजचे नवे दर किती  ?
सोन-चांदीचा दर
| Updated on: May 22, 2026 | 9:08 AM

देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ सुरूच आहे. शुक्रवार, 22 मे रोजी सकाळी भारततील सर्व प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,240 रुपयांपर्यंत वाढला. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 600 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,65,500 रुपये झाला होता. अमेरिकी बाँड्सवरील उच्च परतावा आणि डॉलरचे बळकटीकरण असूनही, मौल्यवान धातूंमधील नवीन खरेदीने सोन्याच्या देशांतर्गत भावाला आधार दिला. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,534.54 डॉलर इतका आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दिल्लीतील सोन्याचा भाव : दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,240 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 1,46,760 आहे.

मुंबई आणि कोलकाता : मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 146,610 रुपये तर 24 क2रेट सोन्याच्या 10 ग्र2साठी 1,59,940 रुपये मोजावे लागतात.

चेन्नईमधील सोन्याचा भाव : 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,61,680 आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी 1, 48, 110 रुपये मोजावे लागतील.

पुणे आणि बंगळूरुमधील भाव : या दोन शहरांमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,59,940 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,46, 610 रुपये इतका आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 146760 160240
मुंबई 146610 159940
अहमदाबाद 146660 160140
चेन्नई 148110 161680
कोलकाता 146610 159940
हैदराबाद 146610 159940
जयपुर 146760 160240
भोपाल 146660 160140
लखनऊ 146760 160240
चंडीगढ़ 146760 160240

चांदीत पुन्हा उसळण

चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या दरातही वाढ झाली आहे. 22 मे रोजी सकाळी, चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2,85,100 वर पोहोचला. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 5 हजारांनी वाढून प्रति किलोग्राम 2,71,000 झाला होता. विश्लेषकांच्या मते, औद्योगिक मागणी कमी असल्यामुळे आणि अलीकडील तीव्र भाववाढीनंतर नफावसुली सुरू असल्यामुळे चांदीचे भाव अस्थिर राहिले आहेत. जानेवारीत चांदीने 4 लाखांचा उच्चांक गाठत मोठा टप्पा पार केला होता, नात्र त्यानंतर चांदीच्या दरात घसरण झाली. असं असलं तरी आता चांदीचे दर पुन्हा वाढताना दिसत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 75.39 डॉलर इतका आहे.

 

Follow Us