Gold Rate Today : सोन्यामुळे पुन्हा दणाणलं धाबं,सराफा बाजारात मोठा उलटफेर; आता 10 ग्रॅमसाठी..

Gold-Silver Rate Today 21 May 2026 Latest News Updates in Marathi : भारतात सोन्याला खूप महत्व आहे. सोनं-चांदीचे जागिने घालणं मोठं प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण गेल्या काही काळापासून सोनं आणि चांदीचे दर जे वाढलेत, ते पाहून सर्वसामान्य नागरिकांना आता हे मौल्यवान धातू खरेदी करणं परवडेल की नाही असाच प्रश्न आहे. आज 21 मे रोजी सोनं-चांदीची स्थिती काय, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील ? सविस्तर जाणून घेऊया

Gold Rate Today :  सोन्यामुळे पुन्हा दणाणलं धाबं,सराफा बाजारात मोठा उलटफेर; आता 10 ग्रॅमसाठी..
21 मे रोजी सोन्याची किंमत किती ?
| Updated on: May 21, 2026 | 9:44 AM

देशभरात सोन्याच्या किमती अचानक आणखीनच वाढल्या आहेत. 21 मे च्या सकाळी देशबरातील बहुतांश शहरात सोन्याचे बाव वर चढलेलेच दिसून आले. राजधानी दिल्लीत तर 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढून डायरेक्ट 1 लाख 58 हजार 510 वर पोहोचले, आणि आर्थिक राजधानी मुंबईत हे भाव थोडेच कमी, 1 लाख 58 हजार 360 रुपये इतके आहेत. पण वाढलेले हे भाव पाहून सर्वसामान्य गार्हकांना खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे. अवघ्या एका दिवसापूर्वीच, दिल्ली सराफा बाजारात 99.9 ९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव 1300 रुपयांनी वाढून प्रति 10साठी ग्रॅम1,64,900 रुपयांवर पोहोचला, दिवसभरात त्यात अनेक चढउतारही झाले. पण आज, गुरावीर भाव पुन्हा वर चढल्याचे दिसून आलं. अमेरिकन बाँडवरील परतावा वाढलेला असून डॉलर मजबूत असूनही, मौल्यवान धातूंच्या नवीन खरेदीमुळे देशांतर्गत सोन्याच्या दरांना आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,483.54 डॉलर इतका आहे.

देशातील महत्वाच्या शहारत सोन्याचे भाव किती ?

दिल्लीत सोन्याचे दर : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,510 रुपये आहे. तर 22 कॅरेटतच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,45,310 रुपये मोजावे लागतील.

मुंबई आणि कोलकाता: मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,45,160 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,360 रुपये आहे.

चेन्नई मध्यो 10 ग्रॅम सोनं कितीला ? : 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹160,900 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹147,490 आहे.

पुणे आणि बंगळुरू : या दोन शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 158360 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 145160 रुपये इतका नोंदवण्यात आला.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 145310 158510
मुंबई 145160 158360
अहमदाबाद 145210 158410
चेन्नई 147490 160900
कोलकाता 145160 158360
हैदराबाद 145160 158360
जयपुर 145310 158510
भोपाळ 145210 158410
लखनऊ 145310 158510
चंदीगड 145310 158510

चांदीचं काय झालं ?

सोन्याची झळाळी वाढली असली तरी चांदीचे दर मात्र खाली घसरताना दिसत आहेत. 21 में रोजी सकाळी चांदीचा भाव 2 लाख 79 हजार 900 रुपये, प्रति किलो इतका आहे. एका दिवसापूर्वी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 5हजारांनी घसरून 2,66,000 पये प्रति किलो झाला. विश्लेषकांच्या मते, अलीकडील भावातील मोठ्या चढ-उतारानंतर औद्योगिक मागणी कमी असल्याने आणि सतत नफावसुली होत असल्याने चांदीचे भाव अस्थिर आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये देशात चांदीच्या भावाने थेट 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात, सध्या स्पॉट चांदीचा भाव 75.42 डॉलर प्रति औंस आहे.

Follow Us