AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today | सलग 7व्या दिवशी सोन्याच्या भावांत घसरण, विक्रमी उच्चांकापेक्षा 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. कमकुवत जागतिक निर्देशांमुळे सोन्याच्या किंमती सलग सातव्या दिवशी खाली आल्या आहेत.

Gold Price Today | सलग 7व्या दिवशी सोन्याच्या भावांत घसरण, विक्रमी उच्चांकापेक्षा 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
सोने-चांदी भाव
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 30, 2021 | 12:58 PM
Share

मुंबई : सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. कमकुवत जागतिक निर्देशांमुळे सोन्याच्या किंमती सलग सातव्या दिवशी खाली आल्या आहेत. शुक्रवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याच्या किंमती 0.12 टक्क्यांनी घसरत आहेत. तथापि, आज चांदीच्या वायदा भावात वाढ होताना दिसत आहे. मे वायदा चांदीच्या दरात 0.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे (Gold silver Price Today on 30 April 2021 MCX Rates).

सोन्याचा भाव (Gold Price on MCX) : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी जून वायदा सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 46,669 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.75 टक्क्यांनी घसरले होते. ऑगस्ट 2020 मधील विक्रमी दर 56,200 प्रति 10 ग्रॅम रुपयांपेक्षाही 10,000 रुपये कमीच आहे.

चांदीचा भाव (Silver Price on MCX) : एमसीएक्सवरील मे वायदा चांदीचा दर 70 रुपयांनी वाढून 67,544  रुपये प्रतिकिलोवर व्यापार करत आहे. मागील सत्रात चांदीच्या दरांत -0.6 टक्क्यांनी घसरले होते.

2020 मध्ये यूएस ट्रेझरी बाँड यील्ड्समध्ये वाढ झाल्यामुळे, सोन्याने चमक काहीशी कमी झाली होती. यावर्षीही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम  तर, चांदी 80,000 रुपये प्रति किलो अर्थात सर्वात उच्चांकावर होती.

यूएस ट्रेझरी बाँडमुळे सोन्यावर दबाव

गुरुवारी (29 एप्रिल) अमेरिकन ट्रेझरी बाँड यील्ड्सने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव आणत दोन आठवड्यांपेक्षा जास्त उच्चांक गाठला आहे. स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 0.2 टक्क्यांनी घसरून 1,767.12 वर घसरले आहेत (Gold silver Price Today on 30 April 2021 MCX Rates).

स्पॉट बाजारभाव

डॉलरच्या घसरणीमुळे गुरुवारी सोन्याच्या किंमती 61 आणि चांदी 1,776 रुपयांनी वधारल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारामध्ये 61 रुपयांच्या वाढीसह सोन्याचे दर 46472 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदीचा भाव 1776 रुपयांनी वाढून 68785 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला आहे.

या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता. परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने वधारले होते.

(Gold silver Price Today on 30 April 2021 MCX Rates)

हेही वाचा :

Gold Price Today: सोने-चांदी पुन्हा एकदा महागले, वाचा ताजे दर

गॅस सिलिंडरपासून बँकिंग व्यवहारापर्यंत 1 मेपासून 5 नियम बदलणार, पटापट वाचा

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप