AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?

HDFC MCLR Rate : एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने काही कालावधीच्या कर्जांसाठी MCLR रेटमध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंट्स (bps) पर्यंत कपात केली आहे.

या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
HDFC MCLR RateImage Credit source: Google
| Updated on: Sep 07, 2026 | 11:22 PM
Share

बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने काही कालावधीच्या कर्जांसाठी MCLR रेटमध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंट्स (bps) पर्यंत कपात केली आहे. बँकेच्या या नव्या व्याजदरांची अंमलबजावणी 7 सप्टेंबर 2026 पासून झाली आहे. त्यामुळे MCLR शी जोडलेल्या कर्जदारांना आगामी काळात व्याजाचा बोजा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

HDFC चा नवा MCLR किती?

1 बेसिस पॉइंट म्हणजे 0.01 टक्के. नव्या कपातीनंतर HDFC बँकेची MCLR रेट आता 7.90 टक्के ते 8.60 टक्के दरम्यान झाला आहे. यापूर्वी ही दररचना 8 टक्के ते 8.65 टक्के होती. नव्या बदलानंतर विविध कालावधीसाठी MCLR पुढीलप्रमाणे आहे.

  • ओव्हरनाइट MCLR: 8% वरून 7.90%
  • 1 महिन्याची MCLR: 8% वरून 7.90%
  • 3 महिन्यांची MCLR: 8.15% वरून 8.05%
  • 6 महिन्यांची MCLR: 8.30% वरून 8.25%
  • 1 वर्षाची MCLR: 8.40% वरून 8.35%
  • 2 वर्षांची MCLR: 8.55% वरून 8.45%
  • 3 वर्षांची MCLR: 8.65% वरून 8.60%

म्हणजेच बँकेने नमूद केलेल्या सर्व कालावधीतील MCLR दरांमध्ये 5 ते 10 bpsची कपात केली आहे.

कर्जदारांवर काय परिणाम होणार?

ज्या ग्राहकांचे कर्ज HDFC बँकेच्या MCLR शी जोडलेले आहे, त्यांना व्याजदर रीसेट झाल्यानंतर कमी व्याजदराचा फायदा मिळू शकतो. मात्र, EMI लगेच कमी होईलच असे नाही. त्याचा परिणाम कर्जाचा रीसेट कालावधी, बँकेकडून आकारला जाणारा अतिरिक्त मार्जिन म्हणजेच स्प्रेड आणि कर्ज करारातील अटींवर अवलंबून असेल.

दुसरीकडे, ज्या ग्राहकांचे कर्ज MCLR शी जोडलेले नाही, त्यांच्यावर या बदलाचा थेट परिणाम होणार नाही. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी हेही लक्षात घ्यावे की MCLR हा केवळ व्याजदर निश्चित करण्याचा एक घटक आहे. ग्राहकाची प्रोफाइल आणि कर्जाचा प्रकार यानुसार बँक अंतिम व्याजदर ठरवते.

MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे बँकेकडून MCLR शी जोडलेल्या कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा किमान आधारदर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2016 मध्ये MCLR प्रणाली सुरू केली. MCLR प्रामुख्याने बँकेसाठी निधी उभारण्याचा खर्च आणि इतर काही घटकांवर अवलंबून असतो. MCLR शी जोडलेल्या कर्जाचा व्याजदर ठराविक कालावधीनंतर रीसेट केला जातो. त्यामुळे MCLR कमी झाली म्हणजे प्रत्येक ग्राहकाची EMI तातडीने कमी होईल, असे नाही. ग्राहकाच्या कर्जाची रीसेट तारीख आणि कर्जाच्या अटींनुसार प्रत्यक्ष फायदा कधी मिळेल हे ठरते.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात