AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुलै-सप्टेंबरमध्ये 8 प्रमुख शहरांत घरांची विक्री 59 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या कारण काय?

Housing.com, PropTiger.com आणि Makaan.com चे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (CEO) ध्रुव अग्रवाल म्हणाले की, कमी व्याजदर, निवासी मालमत्तेच्या किमतींमध्ये घट आणि कोविड साथीच्या दरम्यान आपले स्वतःचे घर खरेदी करण्याच्या संकल्पनेमुळे सुधारणा झाली आहे.

जुलै-सप्टेंबरमध्ये 8 प्रमुख शहरांत घरांची विक्री 59 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या कारण काय?
building
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 18, 2021 | 3:35 PM
Share

नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाच्या आठ प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 59 % वाढून वर्ष-दर-वर्ष आधारावर 55,907 युनिट झाली. PropTiger.com ने ही माहिती दिली. पूर्वीच्या म्हणजे जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत घरांची मागणी तीन पटीने वाढली. हाऊसिंग ब्रोकरेज कंपनी प्रोपटीगरने म्हटले आहे की, साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता रिअल इस्टेट मार्केटमध्ये सुधारणा होत आहे. गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये घरांची विक्री 35,132 युनिट आणि या वर्षी जून तिमाहीत 15,968 युनिट झाली. विविध मालमत्ता सल्लागारांकडून घरांच्या विक्रीबाबतचा हा चौथा तिमाही अहवाल आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये वार्षिक आणि त्रैमासिक आधारावर घरांची विक्री वाढली, असंही अहवाल दर्शवतो.

या कारणांमुळे घरांची विक्री वाढली

Housing.com, PropTiger.com आणि Makaan.com चे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (CEO) ध्रुव अग्रवाल म्हणाले की, कमी व्याजदर, निवासी मालमत्तेच्या किमतींमध्ये घट आणि कोविड साथीच्या दरम्यान आपले स्वतःचे घर खरेदी करण्याच्या संकल्पनेमुळे सुधारणा झाली आहे.

कोणत्या शहरांमध्ये किती विक्री?

प्रोपटीगरच्या मते, अहमदाबादमध्ये जुलै-सप्टेंबर तिमाहीत घरांची विक्री 64 टक्क्यांनी वाढून 5,483 युनिट झाली, जी वर्षभरापूर्वीच्या 3,339 युनिट्स होती. बंगळुरूमध्ये ती 36 टक्क्यांनी वाढून 4,825 युनिट्सवरून 6,547 युनिट्सवर पोहोचली. चेन्नईमध्ये घरांची विक्री दुप्पट होऊन 4,665 युनिट झाली. त्याच वेळी दिल्ली-एनसीआर बाजारात घरांची विक्री 4,458 युनिट्सवर जवळजवळ स्थिर राहिली. गेल्या वर्षी याच कालावधीत येथील घरांची विक्री 4,427 युनिट होती. हैदराबादमध्ये घरांची विक्री दुप्पट होऊन 7,812 युनिट झाली. कोलकातामध्ये ते 7 टक्के वाढीसह 2,651 युनिट्सवर होते. मुंबईतील घरांची विक्री 92 टक्क्यांनी वाढून 7,378 युनिट्सवरून 14,163 युनिट्स झाली. पुण्यात घरांची विक्री 43 टक्क्यांनी वाढून 10,128 युनिट झाली. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ते 7,107 युनिट्सवर होते.

1 वर्षात मालमत्तेच्या किमतीत 25% पर्यंत वाढ

देशातील टियर -2 शहरांमध्ये गेल्या एका वर्षात किमती 10 ते 25 टक्क्यांनी वाढल्यात. येत्या सहा महिन्यांत यात आणखी 15 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाली. राज्याची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये 20 ते 25 टक्के मालमत्तांच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली. यासोबतच चंदीगड, रायपूर, जयपूर आणि बंगळुरू येथील घरांच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.

संबंधित बातम्या

ऑनलाईन मनी ट्रान्सफर करताय, मग NEFT, RTGS आणि IMPS मध्ये काय फरक?

चुकून दुसऱ्याच्या खात्यात रक्कम गेल्यास कशी परत मिळवाल, RBI चे नियम काय?

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!