AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rule of 72: श्रीमंत लोक पैसे कसे कमवतात? हे सूत्र वापरून तुम्हीही बनू शकता करोडपती

How to Become Rich: श्रीमंत लोक हे मोठी जोखीम न घेता चक्रवाढ व्याजातून आणखी पैसे कमवत असतात. याला आर्थिक भाषेत रूल ऑफ 72 म्हणतात. या नियमाच्या आधारे तुम्ही तुम्ही गुंतवलेली रक्कम किती वर्षांमध्ये दुप्पट होऊ शकते याची माहिती मिळते.

Rule of 72: श्रीमंत लोक पैसे कसे कमवतात? हे सूत्र वापरून तुम्हीही बनू शकता करोडपती
Rule of 72
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Nov 09, 2025 | 5:45 PM
Share

आयुष्यात भरपूर पैसे कमवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी आपण सर्वजण कष्ट करत असतो. तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत लोक पैसे कमवण्यासाठी मोठी जोखीम घेतात. मात्र हे चुकीचे आहे. श्रीमंत लोक हे मोठी जोखीम न घेता चक्रवाढ व्याजातून आणखी पैसे कमवत असतात. याला आर्थिक भाषेत रूल ऑफ 72 म्हणतात. या नियमाच्या आधारे तुम्ही तुम्ही गुंतवलेली रक्कम किती वर्षांमध्ये दुप्पट होऊ शकते याची माहिती मिळते. याबाबत सविस्तस माहिती जाणून घेऊयात.

चक्रवाढ व्याजदर

चक्रवाढ व्याज हे पैसे कमावण्याचे महत्त्वाचे साधन आहे. कारण या प्रकारात केवळ तुम्ही गुंतवलेल्या पैशावरच नाही तर त्यावर मिळत असलेल्या व्याजावर देखील व्याज मिळते. सुरुवातीला तुमचे पैसे हळूहळू वाढतात, मात्र काही वर्षांनंतर त्यात झपाट्याने वाढ होते. रूल ऑफ 72 नेमका काय आहे? याचा काय फायदा होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

रूल ऑफ 72 काय आहे?

सूत्र – 72 ÷ वार्षिक परतावा (%) = तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी लागणाऱ्या वर्षांची संख्या

हे उदाहरणाद्वारे समजून घेऊयात, जर तुम्हाला गुंतवणूकीवर 8 % वार्षिक परतावा मिळवत असेल, तर तुमचे पैसे अंदाजे 9 वर्षांत दुप्पट होतील.

  • 2% व्याजदर मिळत असेल तर तुमचे पैसे 36 वर्षांत दुप्पट होतील
  • 4% व्याजदर मिळत असेल तर तुमचे पैसे 28 वर्षांत दुप्पट होतील
  • 8% व्याजदर मिळत असेल तर तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील
  • 10% व्याजदर मिळत असेल तर तुमचे पैसे 7.2 वर्षांत दुप्पट होतील
  • 12% व्याजदर मिळत असेल तर तुमचे पैसे 6 वर्षांत दुप्पट होतील

व्याजदरातील लहान फरक, मोठी रक्कम जमवू शकतो

रूल ऑफ 72 नियमात असे गृहीत धरले जाते की, दरवर्षी चक्रवाढ व्याजाद्वारे परतावा मिळतो. बाजारात चढउतार असेल किंवा इतर काहीही कारण असो, तुम्हाला सरासरी व्याजदर समजला तर या नियमाद्वारे तुम्ही किती वर्षात पैसे दुप्पट होतील हे जाणून घेऊ शकता. तुम्हाला व्याजदरातील 1-2% हा फरक छोटा वाटू शकतो, मात्र दीर्घ काळावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही झपाट्याने चांगला पैसा मिळवू शकतो.

संयमाचे फळ

रूल ऑफ 72 नियम ही केवळ आकडेमोड नाही. यातून समजते की किती व्याजदर मिळतो यापेक्षा किती वेळ तुमचा पैसा मार्केटमध्ये आहे यातून तुम्हाला परतावा मिळते. जे लोक जास्त वेळ बाजारात पैसे गुंतवून ठेवतात, त्यांना नक्कीच जास्त परतावा मिळतो. त्यामुळे तुम्हाही जर चक्रवाढ व्याजदराने पैसे कमवण्याचा विचार करत असाल तुम्हालाही संयम ठेवावा लागेल.

Follow Us
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...