AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही पीएफमधून पैसे काढताय; मग लवकर करा हे काम अन्यथा पैसे अडकणार

सरकार लवकरच तुमच्या पीएफ खात्याचे व्याज हस्तांतरित करेल. हे पैसे फक्त याच महिन्यात तुमच्या खात्यात येऊ शकतात. सरकारने 8.5 टक्के दराने व्याज देण्याची घोषणा केलीय.

तुम्ही पीएफमधून पैसे काढताय; मग लवकर करा हे काम अन्यथा पैसे अडकणार
ईपीएफओ
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 08, 2021 | 11:28 AM
Share

नवी दिल्ली: जर तुम्हीही पुढच्या महिन्यात तुमच्या पीएफ खात्यातून (PF Account) पैसे काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही पुढील महिन्यापर्यंत म्हणजेच 1 सप्टेंबरपर्यंत तुमचे आधार पीएफ खात्याशी (EPFO Link With Aadhaar) लिंक केले नसेल तर तुम्ही भविष्य निधीतून पैसे काढू शकणार नाही. यासह सरकार लवकरच तुमच्या पीएफ खात्याचे व्याज हस्तांतरित करेल. हे पैसे फक्त याच महिन्यात तुमच्या खात्यात येऊ शकतात. सरकारने 8.5 टक्के दराने व्याज देण्याची घोषणा केलीय.

आधार लिंक करण्याची तारीख 1 सप्टेंबर

ईपीएफओने 1 सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक चालान आणि रिटर्न (ECR) भरण्यासाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर ((Universal Account Number) सह आधार लिंक करण्याची तारीख 1 सप्टेंबर केली होती, अर्थात आपल्याकडे आता 23 दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर लिंक करणे आवश्यक आहे.

अन्यथा तुमचे पैसे अडकणार

जर तुम्ही 1 सप्टेंबरपूर्वी EPFO ​​आणि आधार क्रमांक लिंक केले नाहीत, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल.

पीएफ खाते आधारशी लिंक करा

>> सर्वप्रथम तुम्ही EPFO ​​च्या अधिकृत वेबसाईटवर जा. >> या लिंकवर क्लिक करा https: // unifiedportal mem.epfindia.gov.in/memberinterface/ >> आता तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. >> यानंतर व्यवस्थापन विभागात KYC पर्याय निवडा. >> आता ईपीएफ खात्याशी आधार लिंक करण्यासाठी अनेक कागदपत्रे तुमच्या समोर येतील. >> तुम्ही आधार पर्यायावर क्लिक करा आणि आधार कार्डवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचे नाव टाईप केल्यानंतर सेवेवर क्लिक करा. >> यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित असेल आणि तुमचे आधार UIDAI च्या डेटासह सत्यापित केली जाईल. >> तुमचे KYC दस्तऐवज बरोबर असल्यास तुमचे आधार तुमच्या EPF खात्याशी जोडले जाईल. आणि तुम्हाला तुमच्या आधार माहिती समोर “Verify” लिहिलेले मिळेल.

याशिवाय आपण ऑफलाईन लिंक देखील करू शकता

>> “Aadhaar Seeding Application” फॉर्म भरा. >> विनंती केलेल्या सर्व तपशीलांसह फॉर्ममध्ये आपले यूएएन आणि आधार टाका. >> फॉर्मसह तुमच्या यूएएन, पॅन आणि आधारच्या सेल्फ अटेस्टेड प्रती जोडा. >> ईपीएफओ किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आउटलेटच्या कोणत्याही फील्ड ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्हकडे सबमिट करा. >> योग्य पडताळणीनंतर तुमचे आधार तुमच्या ईपीएफ खात्याशी जोडले जाईल. >> यासंदर्भातील मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल.

संबंधित बातम्या

Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?

FD वर 5 वर्षांत 65 हजारांची कमाई, आपल्या ग्राहकांना ‘या’ बँकेची खास ऑफर

If you are withdrawing money from PF, do it early, otherwise the money will get stuck

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!