AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ; हिसाशी ताकेऊची एप्रिलपासून पदभार स्विकारणार, तीन वर्षासाठी नियुक्ती

जपानमधील ओसाका विद्यापीठातून कायद्यातून पदवी घेतलेले ताकेऊ हे येत्या 1 एप्रिलपासून आपला पदभार स्वीकारणार आहेत. कंपनीतील संक्रमण प्रक्रिया सोपी करण्यासाठी म्हणून आयुकावा हे पुढील सहा महिने कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदावर काम करणार आहेत.

मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ; हिसाशी ताकेऊची एप्रिलपासून पदभार स्विकारणार, तीन वर्षासाठी नियुक्ती
takeuchiImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 9:10 PM
Share

मुंबईः भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असलेली मारुती सुझुकी इंडिया कंपनीने (Maruti Suzuki India Company) गुरुवारी महत्वाची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपदी आणि (CEO) सीईओ हिसाशी ताकेउची यांची निवड करण्यात आली आहे. कंपनीच्या बोर्डाकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ताकेउची यांची निवड ही तीन वर्षासाठी असून त्यांचा कार्यकाळ हा 1 एप्रिल 2022 पासून सुरू होऊन 31 मार्च 2025 पर्यंत असणार आहे.

मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपदी आणि सीईओ हिसाशी ताकेउ (Hisashi Takeuchi) यांनी जपानमधील ओसाका विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. ताकेऊ यांची निवड केल्यानंतर कंपनीकडून पूर्णवेळ असलेले एमडी केनिची आयुकावा हे पूर्णवेळ संचालक म्हणूनच कार्यरत असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जपानमधील ओसाका विद्यापीठाचे पदवीधर

जपानमधील ओसाका विद्यापीठातून कायद्यातून पदवी घेतलेले ताकेऊ हे येत्या 1 एप्रिलपासून आपला पदभार स्वीकारणार आहेत. कंपनीतील संक्रमण प्रक्रिया सोपी करण्यासाठी म्हणून आयुकावा हे पुढील सहा महिने कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदावर काम करणार आहेत.

व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत

कंपनीच्या संचालक मंडळाकडून टेकुचीच्या नियुक्तीला पूर्णपणे मान्यता देण्यात आली असली तरी अद्याप कंपनीच्या भागधारकांकडून या निवडीसाठी मान्यता मिळणे बाकी आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (SMC) बरोबर ताकेऊची यांच्या बरोबर कंपनी संबंधित होती. तर जुलै, 2019 पासून ते MSI च्या संचालक मंडळाचा भाग होते आणि एप्रिल, 2021 पासून ते सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न

या निवडीनंतर ताकेऊ यांनी सांगितले की, मारुती सुझुकी ही कंपनीला मोठा वारसा असून ती जगातील एक नामांकित कंपनी आहे. मी भारतात आणि परदेशातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितेल.

संबंधित बातम्या

Sri Lanka Debt Crisis: खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी हाणामारी! 1 लीटर दुधाची किंमत तब्बल 2 हजार, सोन्याच्या लंकेवर एवढी वाईट परिस्थिती का?

Gold Price Today : चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर

Discount मिळालेल्या Russian Crude Oil दरापेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ? Indian Oilने नेमकं काय केलं?

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.