Mutual fund investment : निवृत्तीसाठी फंड उभारताय?…तर म्युच्युअल फंड ठरू शकतो सर्वोत्तम पर्याय

| Updated on: Aug 13, 2022 | 2:10 AM

Mutual fund investment म्युच्युअल फंड निवृत्ती फंड तयार करण्यासाठी मदत करू शकेल का ? हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, तर त्याचे उत्तर हो आहे. म्युच्युअल फंड हे इतर परंपरागत गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक परतावा देतात.

Mutual fund investment : निवृत्तीसाठी फंड उभारताय?...तर म्युच्युअल फंड ठरू शकतो सर्वोत्तम पर्याय
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

निवृत्तीनंतरचे (Retirement) जीवन हा आयुष्यातील (life) सुवर्णकाळ असतो. या काळात आपण सर्व जबाबदाऱ्या आणि सर्व चिंतांमधून मुक्त असतो. हे बोलायला जितके सोपं आहे तितकंच कठीण आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. वाढत्या वयानुसार औषधोपचारचा खर्च वाढतो. त्यामुळे 60 वर्षानंतर औषधौपचरांसाठी खूप पैसा लागतो. पैसा (money) गाठीशी असला तरच आयुष्य सुखासमाधानात जाते. बहुतांश जण तारुण्यात निवृत्तीचं नियोजन करत नाहीत.आतापासून रिटायरमेंटची काळजी कशाला म्हणत चालढकल करत असतात. मात्र, रिटायरमेंटच्या नियोजनासाठी जितका उशिर कराल तेवढ्या पुढे निधी जमा करण्यात अडचणी येऊ शकतात. म्युच्युअल फंड निवृत्ती फंड तयार करण्यासाठी मदत करू शकेल का ? हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, तर त्याचे उत्तर हो आहे. म्युच्युअल फंड हे इतर परंपरागत गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक परतावा देतात. आता जाणून घेऊयात एखाद्या व्यक्तीला रिटायरमेंटनंतर किती पैशाची गरज भासते.

निवृत्तीनंतर किती खर्च?

राहुल पाटील 35 वर्षांचे आहेत आणि एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतात. त्यांचा वर्षाचा खर्च जवळपास 8 लाख रुपये आहे. ते 60 वर्षापर्यंत रिटायर होऊ इच्छितात. म्हणजे येत्या 25 वर्षांत ते रिटायर होतील. आता या काळात सरासरी महागाई 5.5 टक्के राहील असे मानूया. म्हणजेच त्यांना रिटायरमेंटच्या वेळी 7.8 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. तेवढी रक्कम त्यांच्याकडे असेल तरच ते निवृत्तीनंतर 10 ते 15 वर्ष ते निवांत जगू शकतात

एफडीच्या पर्यायाला मर्यादा

सहाजिकच एवढी मोठी रक्कम उभारण्यासाठी बचतीमधील मोठा हिस्सा दर महिन्याला किंवा तीन महिन्याला एखाद्या चांगल्या योजनेत गुंतववावा लागणार. त्यासाठी चांगला परतावा देणाऱ्या योजनेची निवड करावी लागते. एफडी सारख्या परंपरागत बचत योजनेतून मिळणारे व्याज हे महागाईशी सामना करू शकत नसल्यानं एफडी उपयोगाची नाही. याशिवाय एफडीचा व्याज दर कमी झाल्यास निवृत्तीधारकाचं नुकसान होते. यासाठी अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडसारखे पर्याय निवडावेत त्यामुळे निवृत्तीनंतर रोख रक्कम मिळत राहते. म्युच्युअल फंडाचा फायदा निवृत्तीसाठी घेऊ इच्छित असाल तर सिस्‍टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं योग्य ठरते. याचे कारण म्हणजे यामध्ये बाजारातील चढ-उताराचा रुपीकॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा होतो. म्युच्युअल फंडाद्वारे निवृत्तीसाठी निर्धारित फंड जमा केल्यानंतर सिस्‍टेमॅटिक विड्रॉल प्लॉन म्हणजे SWP चा पर्याय निवडता येतो. SWPचा वापर करून वेळोवेळी म्युच्युअल फंडामधून एक ठराविक रक्कम काढता येते. तसेच महिना, तीन महीने-सहा महिन्यांच्या अंतरानं एक पूर्वनिर्धारित रक्कम मिळवू शकता आणि तुमचा खर्च भागवू शकता.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय म्हणतात?

रिटायरमेंट प्लॅनिंसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे. आधी लॉंग टर्मसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी. रिटायरमेंट जवळ आल्यानंतर डेट फंड किंवा SWP च्या माध्यमातून नियमित रक्कम मिळवण्यासाठी निर्णय घ्यावा,असा सल्ला CPF आणि Investography च्या फाउंडर श्वेता जैन यांनी दिलाय.एकूणच गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडात कमी जोखीम आहे तसेच लहान बचत योजनांच्या तुलनेत चांगला परतावा देखील मिळतो. इतर पेंशन योजनांच्या तुलेनत रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात कर बचत देखील होते. त्यामुळे एखाद्या म्युच्युअल फंडाच्या सहाय्यानं तुम्ही कमी जोखीम घेऊन चांगला निवृत्ती फंड सहजपणे उभारू शकता.