AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tur dal Rate | तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! साधं वरण करण्यासाठी ही गृहिणींना करावा लागणार विचार

Tur dal Rate | पेट्रोल,डिझेल, वीज, भाजीपाल्यापाठोपाठ आता डाळी आणि कडधान्यांच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे साधा वरणभात करताना ही गृहिणींना विचार करावा लागणार आहे.

Tur dal Rate | तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! साधं वरण करण्यासाठी ही गृहिणींना करावा लागणार विचार
तूर डाळीचे भाव गगनालाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 12, 2022 | 11:44 AM
Share

Tur dal Rate, नवी मुंबई | पेट्रोल,डिझेल, वीज, भाजीपाल्यापाठोपाठ आता डाळी आणि कडधान्यांच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे साधा वरणभात करताना ही गृहिणींना विचार करावा लागणार आहे. उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC)घाऊक बाजारात तूरडाळ (Tur dal Rate) थेट 115 रुपये किलो झाली आहे. तर किरकोळ बाजारात या किंमतीत 10 ते 20 रुपयांची वाढ झाली असून ग्राहकांना आता एक किलो तुरीसाठी 125 ते 135 रुपये मोजावे लागणार आहे. पावसाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पीके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भाजीपाला आधीच महाग झाला आहे. तर आता डाळी ही महाग (expensive)झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या दरवाढीमुळे किचन बजेट (Kitchen Budget) मात्र कोलमडून जाणार आहे.

यांचे दर स्थिर

बाजारा समितीत भाजीपाला, कडधान्य आणि डाळींचे दर वाढत असताना कांदा, बटाटा आणि लसूण यांचे दर मात्र स्थिर आहेत. कांदा ठोक बाजारात 9 ते 15रुपये किलो या दराने विकला जात आहे. त्यामुळे या महागाईमध्ये सामान्यांना थोडासा दिलासा मिळला आहे.

मूगडाळीचा शिरा कसा खाणार ?

तूरडाळीपाठोपाठ मूगडाळीचे दरही वधरले आहेत. मुगाची डाळ ठोक बाजारात 90 ते 100 रुपये किलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो मूगडाळीसाठी ग्राहकांना 120 रुपये मोजावे लागत आहेत. वालाच्या दरातही वाढ झाली आहे. ठोक बाजारात एक किलो वालाचा दर 120 ते 130 रुपये किलोच्या आसपास गेला आहे.

नवीन पीक आल्यावर दर कमी

गेल्या वर्षी तुरीला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने यंदा तुरीच्या पीकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवला. परिणामी तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. राज्यातील काही बाजारापेठांमध्ये तूर सध्या 100 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे. तुरीचे दर वाढल्यामुळे डाळीच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन पीक तयार झाल्यानंतर हे दर कमी होतील, अशी प्रतिक्रिया ग्रोमाचे सदस्य देवेंद्र व्होरा यांनी व्यक्त केली आहे.

आवक झाली कमी

महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झाला आहे. भाज्यांचे दर ठोक बाजारात 50 ते 100 रुपये किलोच्या आसपास गेले आहेत. त्यामुळे सर्वच भाज्या किरकोळ बाजारात 50 रुपये किलोपेक्षा जास्त दराने ग्राहकांना खरेदी कराव्या लागत आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. भाज्यांपाठोपाठ आता डाळ आणि कडधान्यांचे दरही वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ ठोक बाजारात 80 रुपये किलो या दराने विकली जात होती. मात्र आता एपीएमएसीच्या ठोक बाजारात तूरडाळीचे 100 ते 115 रुपये किलोपर्यंत गेले आहेत.

आफ्रिकेतील तूर ऑक्टोबरमध्ये बाजारात

केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरणात यावेळी ताळमेळ दिसून येत नाही. त्याचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आफ्रिका खंडातील काही देशातून आणि म्यानमारमधून आपल्या देशात तुरीची निर्यात केली जाते. आफ्रिकेतील तुरीचे पीक परिपक्व होण्यास आणखी महिना ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तेथील तूर ऑक्टोबर महिन्यात आपल्या बाजारपेठेत येणार आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.