AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel |पेट्रोलियम जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.39 आणि 90.77 रुपये इतका आहे.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 03, 2021 | 8:55 AM
Share

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे भारतात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून रविवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. त्यानुसार पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलची किंमत 29 पैशांनी वाढली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे.

पेट्रोलियम जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.39 आणि 90.77 रुपये इतका आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

इतर बातम्या:

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?