Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या का?, आधी चेक करा तुमच्या शहरातले दर

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 17 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या का?, आधी चेक करा तुमच्या शहरातले दर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 6:48 AM

मुंबई : देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 17 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.  (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 18th march 2021)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज म्हणजेच बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.77 ₹ 87.45
2 अकोला ₹ 97.45 ₹ 87.16
3 अमरावती ₹ 98.82 ₹ 88.48
4 औरंगाबाद ₹ 98.24 ₹ 87.90
5 भंडारा ₹ 98.27 ₹ 87.95
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.53
7 बुलडाणा ₹ 98.28 ₹ 87.96
8 चंद्रपूर ₹ 97.49 ₹ 87.21
9 धुळे ₹ 97.45 ₹ 87.14
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.86 ₹ 88.52
12 मुंबई उपनगर ₹ 97.62 ₹ 88.64
13 हिंगोली ₹ 98.26 ₹ 87.95
14 जळगाव ₹ 98.61 ₹ 88.25
15 जालना ₹ 98.93 ₹ 88.56
16 कोल्हापूर ₹ 98.04 ₹ 87.73
17 लातूर ₹ 98.90 ₹ 88.55
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.39 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.31 ₹ 87.98
22 नाशिक ₹ 97.90 ₹ 87.54
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.35 ₹ 87.01
25 परभणी ₹ 99.33 ₹ 88.94
26 पुणे ₹ 97.37 ₹ 87.06
27 रायगड ₹ 97.38 ₹ 87.04
28 रत्नागिरी ₹ 98.88 ₹ 88.51
29 सांगली ₹ 97.48 ₹ 87.19
30 सातारा ₹ 98.26 ₹ 87.90
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.10 ₹ 87.78
33 ठाणे ₹ 97.09 ₹ 86.76
34 वर्धा ₹ 97.87 ₹ 87.57
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.87 ₹ 88.53

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) :  91.17 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) :  93.11 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  86.45 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 18th march 2021)

संबंधित बातम्या :

10 दिवसांच्या नियमाचा अंगीकार करा; कधीच भासणार नाही पैशांची चणचण

LIC ची प्रसिद्ध पॉलिसी, दरवर्षी 2500 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 5 लाखांचा फायदा

One Nation One Ration Card: माझे रेशन मोबाईल अ‍ॅप लाँच; देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आता धान्य उपलब्ध

(Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 18th march 2021)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.