AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price Today : आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या काय आहेत किंमती, वाचा ताजे दर

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 19 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

Petrol-Diesel Price Today : आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या काय आहेत किंमती, वाचा ताजे दर
| Edited By: | Updated on: Mar 20, 2021 | 6:49 AM
Share

मुंबई : देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 19 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.  (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 20th march 2021)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. आज म्हणजेच शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.77 ₹ 87.45
2 अकोला ₹ 97.45 ₹ 87.16
3 अमरावती ₹ 98.82 ₹ 88.48
4 औरंगाबाद ₹ 98.24 ₹ 87.90
5 भंडारा ₹ 98.27 ₹ 87.95
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.53
7 बुलडाणा ₹ 98.28 ₹ 87.96
8 चंद्रपूर ₹ 97.49 ₹ 87.21
9 धुळे ₹ 97.45 ₹ 87.14
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.86 ₹ 88.52
12 मुंबई उपनगर ₹ 97.62 ₹ 88.64
13 हिंगोली ₹ 98.26 ₹ 87.95
14 जळगाव ₹ 98.61 ₹ 88.25
15 जालना ₹ 98.93 ₹ 88.56
16 कोल्हापूर ₹ 98.04 ₹ 87.73
17 लातूर ₹ 98.90 ₹ 88.55
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.39 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.31 ₹ 87.98
22 नाशिक ₹ 97.90 ₹ 87.54
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.35 ₹ 87.01
25 परभणी ₹ 99.33 ₹ 88.94
26 पुणे ₹ 97.37 ₹ 87.06
27 रायगड ₹ 97.38 ₹ 87.04
28 रत्नागिरी ₹ 98.88 ₹ 88.51
29 सांगली ₹ 97.48 ₹ 87.19
30 सातारा ₹ 98.26 ₹ 87.90
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.10 ₹ 87.78
33 ठाणे ₹ 97.09 ₹ 86.76
34 वर्धा ₹ 97.87 ₹ 87.57
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.87 ₹ 88.53

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) :  91.17 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) :  93.11 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  86.45 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 20th march 2021)

संबंधित बातम्या :

गावात 10 रुपयांना मिळणार LED बल्ब; मोदी सरकारकडून ग्राम उजाला कार्यक्रम सुरू

Gold Rate Today: 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45000 पर्यंत खाली, आता खरेदीमध्ये होणार बचत

Gold Price Today : आज पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, पटापट चेक करा ताजे दर

(Petrol Diesel Price Today rates in mumbai pune delhi petrol price today on 20th march 2021)

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश