Petrol Price Today : राज्यात आजही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल महागलं, वाचा ताजे दर

नांदेडमध्ये महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात सर्वात महागडे पेट्रोल विकलं जात आहे.

Petrol Price Today : राज्यात आजही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल महागलं, वाचा ताजे दर
पेट्रोल आणि डिझेल
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 6:49 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहनचालकांचं कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे. नांदेडमध्ये महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात सर्वात महागडे पेट्रोल विकलं जात आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहेत. (Petrol Price Today Petrol is still expensive in nanded mumbai pune read the latest rates of delhi kolkata)

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात महागडं पेट्रोल मिळतं. मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी धर्माबाद इथल्या पेट्रोल/डिझेलचे दर हे डोळे चक्रावून सोडणारे आहेत. आज धर्मदाबादमध्ये पेट्रोल 99.17 लिटर आणि डिझेल 88.69 प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 95.46 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Petrol Price Today): 95.36 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Petrol Price Today ): 95.39 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Petrol Price Today): 95.54 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 88.99 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 90.25 रुपये

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 91.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 86.34 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Diesel Price Today): 84.94 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Diesel Price Today): 85.04 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Diesel Price Today): 85.14 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 79.35 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 82.94 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) 84.44 रुपये प्रतिलिटर

धर्माबादला सोलापूरच्या ऑइल डेपोतून इंधन पुरवठा होतो, हे अंतर अधिकचे असल्याने इथे इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. मात्र शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात प्रति लिटर पाच रुपयाने इंधन स्वस्त आहे.

भोपाळमध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर

बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती 90 पार पोहोचल्या आहेत. महानगरांमध्ये पेट्रोलचे दर 95 च्याही पुढे गेले आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर पोहोचली आहे. अतिरिक्त प्रीमियम पेट्रोलची किंमत प्रति लिटर 99.99 रुपये आहे. तर साध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.69 रुपयांवर पोहोचली आहे. यावेळी डिझेल 87.20 रुपये तर प्रीमियम डिझेलची किंमत 91.31 रुपयांवर गेली आहे.

सात दिवसात इंधनाच्या किमती किती वाढल्या?

गेल्या सात दिवसात पेट्रोलच्या किमतीत 2.08 रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 2.23 रुपये वाढ झाली. आता फक्त फेब्रुवारी महिन्याबद्दलच बोलायचं झालं तर डिझेलच्या किंमतीमध्ये 2.58 रुपये आणि पेट्रोलमध्ये 2.43 रुपये प्रतिलिटर वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे स्थानिक शहरांमध्ये कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले.

तीन अंकी डिस्प्लेच नाही

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा थेट परिणाम पेट्रोल पंपांवर झाला आहे. कारण पेट्रोलच्या मशीनमध्ये 3 अंकी डिस्पेलच नाही आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी ऐन सुट्टीच्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Petrol Price Today Petrol is still expensive in nanded mumbai pune read the latest rates of delhi kolkata)

संबंधित बातम्या – 

Petrol at 100: ऐन महागाईत पेट्रोलचंही शतक, 3 अंकी किंमतीमुळे पंप पडले बंद

नांदेडमध्ये देशातील सर्वात महाग इंधन, धर्माबादमध्ये पेट्रोल नाबाद 98

Petrol and Disel price: जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर

(Petrol Price Today Petrol is still expensive in nanded mumbai pune read the latest rates of delhi kolkata)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.