Prudent Corp : गुंतवणुकदार ठरले ‘प्रुडंट’ ! एका शेअरमागे 30 रुपयांची वाढ, अधिक माहिती जाणून घ्या…

| Updated on: May 20, 2022 | 1:45 PM

Prudent Corp IPO Listing: प्रुडंट कॉर्पोरेट अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेस हा भारताचा सर्वोच्च म्युच्युअल फंड वितरक आहे. कमिशनमधून कंपनी चांगली कमाई करते.

Prudent Corp : गुंतवणुकदार ठरले प्रुडंट ! एका शेअरमागे 30 रुपयांची वाढ, अधिक माहिती जाणून घ्या...
शेअर बाजार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : भारतातील अग्रगण्य आणि स्वतंत्र रिटेल संपत्ती व्यवस्थापक, प्रुडंट कॉर्पोरेट अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस (Prudent Corporate Advisory Services) या कंपनीने आज शेअर बाजारात प्रवेश केला. बीएसईवर (BSE) सुमारे 5 टक्के प्रीमियमवर हा स्टॉक 660 रुपयांवर सूचीबद्ध झाला. एनएसईवर (NSE) हा शेअर 3.17 टक्के प्रीमियमसह 650 रुपयांवर लिस्ट करण्यात आला होता. इश्यू प्राइस प्रति शेअर 630 रुपये होती. यापूर्वी प्रुडंट कॉर्पोरेट अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेसचा आयपीओ (IPO) शेवटच्या दिवशी 1.22 वेळा सब्सक्राइब झाला होता. हा आयपीओ 10 मे रोजी उघडला होता आणि 12 मे रोजी बंद झाला होता.ही कंपनी थर्ड पार्टीसाठी डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करते आणि त्यातून कमिशन मिळवते. त्याचे स्वतःचे उत्पादन नाही, परंतु ते त्याच्या प्लॅटफॉर्मवर इतरांची उत्पादने विकते. त्याचे स्वतःचे उत्पादन नाही, परंतु ते त्याच्या प्लॅटफॉर्मवर इतरांची उत्पादने विक्री करतात. देशातील अव्वल म्युच्युअल फंड वितरक असलेल्या या कंपनीच्या सुचीबद्ध यादीवर अस्थिरता आणि बाजाराच्या नकारात्मक दिशेचा परिणाम झाला आहे.

प्रुडंट कॉर्पोरेट अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेसचा 538.61 कोटी रुपयांचा आयपीओ 1.22 पट सबस्क्राइब झाला. त्याचा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB ) हिस्सा 1.26 पट सबस्क्राइब झाला, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NLS ) चा हिस्सा 0.99 पट सबस्क्राइब झाला. पण किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी 1.29 पट सदस्यता घेतली.

हे सुद्धा वाचा

लिस्टिंगनंतर शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक कमी

लिस्टिंगनंतर प्रुडंट कॉपोर्रेटचा शेअर घसरला आहे. बीएसई वर हा शेअर 10.16 टक्क्यांनी घसरून 592.95 रुपयांवर आला. व्यापारादरम्यान हा शेअर 585.05 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. कंपनीचे मार्केट कॅप 2,458.73 कोटी रुपये आहे.

कमिशनमधून कमाई

प्रुडंट कॉर्पोरेट अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेस सीएचएल व्यवसाय प्रामुख्याने म्युच्युअल फंड वितरणाशी संबंधित आहे. याशिवाय ही कंपनी अन्य 2 प्रकारच्या आर्थिक उत्पादनांचे वितरणही करते. यामध्ये विमा, पोर्टफोलिओ व्यवस्थापन योजना, पर्यायी गुंतवणूक निधी, कॉर्पोरेट मुदत ठेवी, रोखे, अनलिस्टेड इक्विटीज, स्टॉक ब्रोकिंग सोल्यूशन्स, सिक्युरिटीज आणि एनपीएसच्या बदल्यात कर्ज यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे.

ही कंपनी थर्ड पार्टीसाठी वितरक म्हणून काम करते आणि त्यातून कमिशन मिळवते. त्याचे स्वतःचे उत्पादन नाही, परंतु ते त्याच्या प्लॅटफॉर्मवर इतरांची उत्पादने विकते. त्याचे स्वतःचे उत्पादन नाही, परंतु ते त्याच्या प्लॅटफॉर्मवर इतरांची उत्पादने विकते. 31 डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीची अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट 48,411 कोटी रुपये आहे. यात 92 टक्के हिस्सा इक्विटीवर आधारित म्युच्युअल फंडांचा आहे.

कंपनीची कामगिरी

आर्थिक वर्ष 2020-21 साठी कंपनीचा एकूण महसूल 277.56 कोटी होता. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 229.31 कोटी इतका होता. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 45.30 कोटी होता, जो आधीच्या आर्थिक वर्षात 27.85 कोटी होता. 31 डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीचे एकूण कर्ज 33 कोटी रुपये आहे.

ही ऑफर पूर्णपणे सेलसाठी ऑफर होती. या इश्यूच्या माध्यमातून भागधारक आणि प्रवर्तकांनी 8.55 दशलक्ष शेअर्सची विक्री केली. वॅग्नर (Wagner) यांनी 8.28 दशलक्ष शेअर्सची म्हणजेच 50 टक्के, शिरीष पटेल यांनी सुमारे 2.68 लाख शेअर्सची विक्री केली. कंपनीत वॅग्नर (Wagner) यांची भागीदारी 40 टक्के, तर पटेल यांची 3.15 टक्के होती.